Weather Updates : राज्यात मान्सून पुन्हा अॅक्टिव्ह; शनिवारपासून मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट
Weather Updates : महाराष्ट्रात 18, 19 सप्टेंबर रोजी मराठवाडा, खान्देशमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update : मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात (Maharashtra Rains) पुन्हा एकदा पावसाची (Rain Updates) शक्यता आहे. शनिवारपासून मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान पुढील 48 तासात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे आणि रायगडसह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये आयएमडीनं (IMD)अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. झारखंडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. गंबांगलादेशाजवळील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पर्जन्यवृष्टीमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे या अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे.
महाराष्ट्रात 18, 19 सप्टेंबर रोजी मराठवाडा, खान्देशमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यात वरुणराजा बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
Regional Meteorological Center, Mumbai नं दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 17, 2024
शुक्रवारी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रविवारी विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित भागात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा अॅक्टिव्ह
मान्सूनचा हंगाम मागे पडू लागल्यानं महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्यानं (IMD) मान्सूनचा कालावधी संपण्यापूर्वी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होईल. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी बरसण्याची अपेक्षा आहे. मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरणासह अधूनमधून सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर, पुणे आणि आसपासच्या भागातही पाऊस पडेल, असा अंदाज आहे.