अहमदनगर:  एखाद्या कार्यक्रमात वक्त्याच्या भाषणाची वेळ संपत आली तर चिठ्ठी  पाठवून वक्त्याला  थांबण्याचे संकेत दिले जातात. त्यातून योग्य संदेश तर जातोच;पण वक्त्याचा अपमान होईल असे काही घडत नाही. मात्र जळगावातल्या जामनेरमध्ये काल शरद पवारांच्या (Sharad Pawar)  उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.  या मेळाव्यात रोहिणी खडसे (Rohini Khadse)  यांना भाषण उरकवण्याची सूचना मिळाल्याने रोहिणी खडसे यांनी भाषणातून आपली नाराजी व्यक्त केली. 'एका महिलेला पाच मिनिटे बोलायला सांगाल तर कसं चालेल', असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.  हे महाविकास आघाडीचे व्यासपीठ आहे इथे महिलांना समसमान अधिकार असल्याचे  अशा शब्दांत  ठणकावले.


   शरद पवारांनी आम्हाला समान हक्क दिलेला असून व्यासपीठावरील पुरुष बोलू शकतात तेवढा आमचाही अधिकार आहे.   एका महिलेला पाच मिनिटे बोलायला सांगाल तर कसं चालेल अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी शरद पवारांसमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर आपण महायुतीच्या व्यासपीठावर नाही तर महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आहोत आणि तिथे महिलांना समसमान अधिकार असल्याचेही रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत. 


शरद पवारांनी मला आम्हला समान हक्क दिला :  रोहिणी खडसे 


 रोहिणी खडसे म्हणाल्या, मला चिठ्ठी मिळाली लवकर आटपा पण कसे आहे. शरद पवारांनी मला आम्हला समान हक्क दिलाय जेवढे पुरुष बोलू शकतात तेवढा वेळ महिला बोलू शकतात. आपण महायुतीच्या नाही तर महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आहोत. या व्यासपीठावर कायमच महिलांना समान अधिकार देण्यात आला आहे. 


नाथाभाऊ या पक्षात राहून गद्दारी करू शकले असते,पण ते मनाला पटत नाही :  रोहिणी खडसे 


एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर रोहिणी खडसे म्हणाल्या, नाथाभाऊ कोणत्या परिस्थितीमध्ये भाजपात जात आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यात मी भाष्य करणार नाही, मात्र आमच्या रक्तात गद्दारी नाही. जेव्हापासून आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून आम्ही निष्ठेने राष्ट्रवादी पक्षाच्यासोबत प्रामाणिकपणाने काम केले आहे. जिथे उभे राहतो तिथे ठामपणाने उभे राहतो आणि जिथे जमत नाही तिथे आम्ही बाजूला होतो. नाथाभाऊ या पक्षात राहून गद्दारी करू शकले असते,पण ते मनाला पटत नाही.  म्हणून त्यापेक्षा वेगळे व्हायचे. मी पक्षाच्या सोबत राहणार आहे आणि निष्ठेने काम करणार आहे.


 हे ही वाचा :


तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवाय की गरम होतंय म्हणून परदेशात जाऊन आराम करणारा माणूस हवाय; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला