Maharashtra Weather Update: सातारा, कोल्हापूरसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याच्या पावसाचा अंदाज, किनारपट्टीसह कुठे काय अलर्ट?
Weather Update: काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाचा जोर कमी झालेला असताना गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह दक्षिण व मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. शुक्रवारी तळ कोकणासह बहुतांश महाराष्ट्रात पावसाचे हाय अलर्ट देण्यात आले होते. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवस पावसाचा जोर हळूहळू ओसरणार असल्याचं सांगितलं. तळ कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहेत. मराठवाड्यात धाराशिव, लातूर तसेच विदर्भात अकोला अमरावतीतही जोरदार पावसाची शक्यता आहे .
हवामान विभागाचा अंदाज काय ?
हवामान विभागाच्या ताज्या उपग्रह निरीक्षणानुसार, सध्या कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवर तसेच उत्तर गुजरात राजस्थान व महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वाऱ्यांची शक्यता आहे .घाटमाथ्यांवर व पूर्व विदर्भाच्या बाजूला सध्या पावसाचे काळे ढग दिसत आहेत असे IMDने सांगितले .प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने दिलेला अंदाजानुसार, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे .यावेळी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील .हलका व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे .
कोणत्या जिल्ह्याला काय अंदाज ?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज (19 जुलै) तळ कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आले आहेत .
यलो अलर्ट : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर,सोलापूर, धाराशिव ,लातूर, अकोला, अमरावती
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आज हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे .तसेच मध्य महाराष्ट्रातही हलक्या सरींचा अंदाज देण्यात आला .
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/N3LxaU0VwO
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 18, 2025
पुढील तीन दिवस पावसाचा जोर कमी होणार असून दोन दिवसांनी तळकोकण व विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट आहेत .उर्वरित ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे . दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तळकोकण, विदर्भातील काही जिल्हे वगळता उर्वरित भागात पुढील चार दिवस पावसाची ओढ राहणार असल्याचा अंदाज आहे.
हेही पहा























