शेतकऱ्यांनो पिकं सांभाळा! राज्यात वादळी पावसासह गारपीटीचा इशारा, कोणत्या भागात काय अलर्ट? वाचा..
Maharashtra Weather Update Today: काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Maharashtra Weather Update: कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये 27 आणि 28 डिसेंबर दरम्यान मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात वादळी पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यात 26 डिसेंबरपासून ढगाळ हवामानाला सुरुवात होणार असून, 26 डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, आणि सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील काही भागांत पावसाची शक्यता आहे. 27 डिसेंबरला खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध भागांमध्ये पावसाच्या शक्यतेसह वादळी वाऱ्यांची परिस्थिती तयार होण्याचा अंदाज आहे. 28 डिसेंबरला खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
26 डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; 27 डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि 28 डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
वादळी पावसासह गारपीटीची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा सक्रीय पट्टा तयार झाला आहे आणि अरबी समुद्रात आर्दता वाढली आहे. यामुळे राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.याबरोबरच, राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. कडाक्याची थंडी कमी झाली असून, पुढील काही दिवसांत किमान तापमानात २-४ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाची सांगता वादळी पावसानं होणार असल्याचं हवामान खात्याच्या अंदाजावरून दिसत आहे.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या ताज्या अंदाजावर लक्ष ठेवून आवश्यक सावधगिरी बाळगावी आणि तयारी ठेवावी, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाने या स्थितीची तात्काळ दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीला मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची संरक्षण व्यवस्था, गारपीट प्रतिकारक उपाय, तसेच पिकांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजाचे पालन करून पुढील नियोजन करण्याचे सुचवले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
26 डिसेंबर- धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर
27 डिसेंबर- नाशिक, पुणे, नगर,जळगाव,धुळे, नंदूरबार,छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी,बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम
हेही वाचा:
वादळी वाऱ्यासह गारपीटही! वर्षाच्या शेवटी राज्यात पावसाचा धुमाकुळ, वाचा IMDचा अंदाज