मुंबई : एकीकडे मान्सूनची (Monsoon) चाहूल लागली असताना दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) प्रकोप पाहायला मिळत आहे. केरळमधून मान्सून तामिळनाडूत पोहोचला असताना महाराष्ट्रालाही मान्सूनची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्रात पुढील 48 तासात विविध भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यात पुढील दोन दिवस उन्हाच्या झळा बसणार असून त्यानंतर पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
कुठे ऊन, कुठे पाऊस
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज 2 मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. आयएमडीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.
ठाणे, मुंबईतही पावसाचा अंदाज
तसेच, सोलापर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गातही पावसाचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, 3 आणि 4 जून रोजी रायगड आणि रत्नागिरीत पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे जिल्ह्यामध्ये 4 आणि 5 जूनला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
पुढील 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा
कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत पुढील 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :