मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) विदर्भ (Vidarbh) आणि मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यांना अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) झोडपून काढलं आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा (Tempeture Hike) 40 पार गेला आहे. काही भागात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. तर काही भागात रिमझिम पावसामुळे (Unseasonal Rain) उन्हाच्या झळांपासून काही अंशी दिलासा मिळाला आहे. कोकणातही ऊन-पाऊस असा खेळ सुरु आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे, तर दक्षिण कोकणात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची झळ बसत आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संत्रा बागेचं नुकसान
वर्धा (Wardha) जिल्ह्यातील तळेगाव येथील अर्जून दिंडेकर यांच्या शेतातील संत्रा बागेचं अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काही संत्रा झाड वादळात मुळासकट जमीनदोस्त झाली आहेत. दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळ, अवकाळी पावसाने शेतकऱ्याची कंबर मोडली आहे. संत्र्याला बहर येत असताना झाड जमीनदोस्त झाल्यानं अंदाजे पाच लाखांचं नुकसान झालं आहे. नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
विदर्भात (Vidarbha) कपाशीचं (Cotton) पिक मोठया प्रमाणात घेतलं जातं. सध्या एप्रिल महिन्यात अधीमधी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आहे, त्यातच उन्हाचा पारा मागील सोमवारी 40 च्या वर गेलेला नाही तर आजही सोमवारी तापमान 40 च्या वरती गेलं नाही. त्यामुळे ऊन काही वाढेना आणि जमीन काही कोरडी होईना असं शेतकरी म्हणताय. त्यामुळे कपाशीसाठी हे वातावरण नुकसानकारक असल्याचं शेतकरी सांगत आहेत.
पावसामुळे काही जिल्ह्यात उकाड्यापासून दिलासा
भंडारा (Bhandara) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. चार दिवस पावसाची रिमझिम सुरू होती. मागील आठवड्यात जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट तर कुठं जोरदार पावसाची हजेरी लागली होती. यामुळं अनेक भागातील शेती-पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिता वाढली आहे. मागील काही दिवसात उन्हाची काहीली वाढली होती, मात्र अवकाळी पावसामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :