पुणे : अजित पवार अनेकांना मतदारसंघात धमक्या देत आहे, असा आरोप अजित पवारांवर (Ajit Pawar) होत आहे. भर सभेतून महाविकास आघाडीकडून अशा प्रकारचे आरोप आजित पवारांवर केले जात आहे. मात्र वेळोवेळी अजित पवारांकडून हे आरोप फेटाळले जात आहे. धमकी दिली असेल तर तक्रार करा, पुढे या, असं अजित पवार म्हणताना दिसत आहे. यावर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सडेसोत उत्तर दिलं आहे. अजित पवार धमक्या देत आहेत, अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे आणि दादांची स्टाईल सगळ्यांना माहितीये, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवार धमकी देत असल्याच्या चर्चांना दुजोरा दिला आहे. 


'शरद पवारांवर टीका केली की हेडलाईन होते'


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मागील 60 वर्षांपासून शरद पवार राजकारणात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांंच्यावर टीका केली आहे. मागील 60 वर्षांपासून त्यांच्यावर टीका केली जात आहे. शरद पवारांवर टीका केली की हेडलाईन होते हे कायम म्हणते. तेच यावेळीदेखील झालं आहे. मोदींनी केलेल्या टीकेवर शरद पवारांंनी उत्तर दिलं आहे. त्यामुळे यावर काहीही बोलणं योग्य नाही. 


देशात सध्या चार मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार आणि दुष्काळ या चार मुद्द्यांना सोडून निवडणुकीत सगळ्यामुद्द्यांवर चर्चा होताना दिसत आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आता चर्चा करण्याचा वेळ आली, असल्याचं त्या म्हणाल्या शिवाय आमचा प्रचार दणक्यात सुरु आहे. साधारण तीन महिने प्रचाराला मिळत असतात. यावेळी विविध मुद्दे घेऊन आम्ही प्रचार करतोच मात्र संपूर्ण साडेचार वर्ष मी माझ्या सगळ्या विधानसभा मतदार संघात भेटी देत असते. त्यामुळे तीन महिनेच नाही साडे चार वर्ष आम्हील लोकसभेचा प्रचार करत असतो, असं त्या म्हणाल्या. 


अजित पवारांनी शिर्सुफळच्या सभेत MIDC देणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यावर त्या म्हणाल्या की, अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होते, ज्याने आमच्या एकत्र मिटींग घेतल्या आहेत. ते स्वतः  अनेक मिटींगला होते. एमआयडीसी का झाली नाही ? कारण भूसंपादन झाला नाही, तुम्ही विसरता दादा स्वतः 18 वर्ष पुण्याचे पालक मंत्री राहिले आहे. आदरणी दादांच्या हातात पुण्याचा सगळं कारभार होता मात्र आता माझ्यावर टीका होते याचा उत्तर मी कसं देऊ, असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे. 


इतर महत्वाची बातमी-


कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस


Shrirang Barne : मोदींच्या सभेनंतरही महायुतीत खदखद कायम; प्रचारावर नजर ठेवण्यासाठी दिल्लीचं पथक मावळात पाठवण्याची 'वेळ'.


Guru Gochar 2024 : आज होणार गुरु ग्रहाचं सर्वात मोठं संक्रमण! पुढच्या वर्षापर्यंत 'या' राशींवर असणार गुरुची कृपा; धन-संपत्तीत होईल प्रचंड वाढ