Maharashtra Rain Live updates : जूनअखेर मध्य महाराष्ट्रात 51 टक्के तर मराठवाडा 69 टक्के पावसाची नोंद
Maharashtra Rain Live updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
जून महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील विविध भागात मान्सूनचे अपडेट ( जून महिन्यातील आतापर्यंत सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे).
मराठवाडा- 69 टक्के
केरळ- 60 टक्के
दक्षिण कर्नाटक- 56 टक्के
उत्तर कर्नाटक - 54 टक्के
मध्य महाराष्ट्र- 51 टक्के
तेलंगणा - 50 टक्के
Maharashtra News: राज्यात 4 जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी असणार
मात्र, कोकण आणि विदर्भात दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज
कोकणासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी, भारतीय हवामान विभागाची माहिती
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
मुंबईसाठी मात्र आज यलो अलर्ट, मात्र, कालपेक्षा आज पावसाची तीव्रता अधिक, काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी
4 जुलैपासून पुन्हा एकदा राज्यात धुवांधार पाऊस, 4 जुलैनंतर मराठवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज
आज उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार आणि धुळ्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज
नाशिक, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर देखील मुसळधार पावसाची शक्यता
Palghar Rain Updates: पालघर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात उद्यापासून पावसाचा जोर हलका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कायम राहणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं असून दोन ते पाच जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Rain : जुलैच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमी होणार
पुणे हवामान विभागाचे विभाग प्रमुख डॉ अनुपम कश्यपी यांची माहिती
आधी वर्तवलेल्या अंदाजात बदल
कोकण सोडल्यास महाराष्ट्रातील इतर भागात मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता
मध्य प्रदेशमधील कमी दाबाच्या क्षेत्राची वाटचाल उत्तर प्रदेशकडे होत असल्यानं पावसाचा वेग कमी होणार
पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर घाट परिसरात 1 आणि 2जुलैला येलो अलर्ट जारी
पुणे शहरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात हलक्या पाऊसाची शक्यता
शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी अनुकूल वातावरण
मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील चार दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं गोसीखुर्द धरणाच्या ऊर्ध्व भागातील धापेवाडा बॅरेजचा सुमारे 4000 क्युमेक्सपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी रात्रीपासून गोसीखुर्द धरणाचे तीन गेट अर्धा मिटरनं उघडण्यात आली असून त्यातून सध्या 17407 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाच्या परिस्थितीनुसार आणखी गेट उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
Pune Rain : मुसळधार पावसाने पुण्याच्या कामशेत येथील इंद्रायणी नदीवर असलेला वाडीवळे साकव (मातीचा) पूल वाहून गेला वाहून गेला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यामुळं वाडीवळे गावची दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे. तर या गावाला जोडणाऱ्या वडीवळे, वळख बुधवडी, संगिशे, वेलवळी नेसावे खांडशी या गावांचा संपर्क तुटला आहे. इंद्रायणी नदीवर वाहतुकीसाठी नवीन पूल बांधण्यात येत आहे. परंतु स्थानिक शेतकरी,विद्यार्थी आणि दुग्ध व्यवसाय करणारे तसेच कामगारांची कुचंबणा होऊ नये यासाठी तीन महिन्यांपूर्वी हा तात्पुरता साकव पूल बंधारा टाकण्यात आला. मात्र गेले आठ दिवस झाले नाणे मावळला पावसाने झोडपले आहे. त्यामुळं इंद्रायणी नदीचा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळं पुलावरुन पाणी वाहू लागले होते तर आज सकाळी या पुलाची मातीच वाहून गेली आहे.
Rain : पावसामुळं राज्य महामार्ग क्रमांक 166 पाली ते साखरपा गाव दरम्यान नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचलेला आहे. त्यामुळं सदरचा राज्य महामार्ग रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत रस्ता बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून 1) मुंबई व रत्नागिरी कडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक पाली पासून लांजा - दाभोळ मार्गे कोल्हापूर दिशेने वळवण्यात आलेली आहे. 2) कोल्हापूरकडून येणारी वाहतूक दाभोळ फाटा-लांजा-मार्गाने वळवण्यात आलेली आहे.
Rain : रत्नागिरी- रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील रस्ता खचला
नाणीज जवळ रस्त्ता रात्रीच्या सुमारास खचला
मिऱ्या ते नागपूर जाणाऱ्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आहे सुरु
रात्री साडेबारा वाजल्यापासून कोल्हापूरकडे आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतुक झाली होती ठप्प
खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना
अजूनही वाहतुकीवर मोठा परिणाम
Ratnagiri : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेडची जगबूडी नदी सध्या इशारा पातळीवर वाहत आहे. गेले तीन दिवस जिल्ह्यात पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळं नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या जगबुडी नदी साडेपाच मीटर पातळीवर वाहत आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates: राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी
राज्यातील नागपूर, मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.
कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.
शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत, पेरण्या खोळंबल्या
राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाया गेली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -