पुढील तीन दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Live updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे.

abp majha web team Last Updated: 28 Jun 2023 04:26 PM
Bhandara news : भंडारा SDM सह दोन तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई, पोलीस पाटील, कोतवाल भरती प्रकरण

भंडारा इथे मे महिन्यात पोलीस पाटील आणि कोतवाल भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या आरोप उमेदवारांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केल्यानंतर अवर सचिवांनी यात भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांसह दोन भंडारा आणि पवणीच्या तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईनं प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. कारवाई करण्यात आलेल्यामध्ये भंडाऱ्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे आणि पवनीच्या नीलिमा रंगारी यांच्या समावेश आहे. रवींद्र राठोड हे सध्या पालघर इथं कार्यरत असून अरविंद हिंगे हे भंडारा तर, नीलिमा रंगारी या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही इथं कार्यरत आहेत.

Konkan Rain : कोकणात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा 

Konkan Rain : कोकणात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा 


संपूर्ण कोकणासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज 


मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट, प्रादेशिक हवामान केंद्राची माहिती 


पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा 


पुणे, नाशिक आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर आज काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता 


मराठवाड्यात आज हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज 


विदर्भात आज सर्वत्र पावसाचा अंदाज, नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राची माहिती

आंबेनळी घाटातील वाहतूक बंद, रस्ता खचल्यानं घेतला निर्णय

Rain : मध्यरात्री पोलादपूर मधील आंबेनळी घाटात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दरड खाली आल्याने रात्रभर हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आज सकाळी महामार्गावर आलेली दरड बाजूला करण्यात आली परंतु दरड महामार्गावरती पडल्याने महामार्गाला चिरा गेल्या असून घाटाचा भागाचा रस्ता खचल्याने सध्या तेथील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे. पर्यायी ताम्हाणी घाटाचा वाहतुकीसाठी वापर करावा असे प्रशासनाकडून आव्हान करण्यात आले आहे..

विशाळगडाचा बुरुज ढासळला, शिवप्रेमींनी व्यक्त केली नाराजी

Satara : विशाळगडाचा बुरुज ढासळला


पावसामुळे बुरुज ढासळला


पुरातत्व विभागाकडे दुरुस्तीची मागणी करूनही दुर्लक्ष 


शिवप्रेमींनी व्यक्त केली नाराजी

मुंबईतील जोरदार पाऊस, पालिका आयुक्त चहल घेणार आढावा

Mumbai Rain : मुंबईत पहिल्या पावसात अनेक सखल भागात पाणी भरल्यानंतर आणि यावर विरोधकांकडून टीका झाल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासक आयुक्त इकबाल सिंह चहल हे आज पावसात सखल भागासह नालेसफाई संदर्भातील आढावा घेणार आहेत. यामध्ये हिंदमाता येथे पावसाळी उपाययोजनाची पाहणी, त्यासोबतच बीकेसी येथील मिठी नदी पुलावर आयुक्त पाहणी करणार आहेत.

मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये जोरदार पाऊस, काही ठिकाणी वाहतूक कोंडी

Mumbai Rain : मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. जर असाच पाऊस सुरू राहिला तर सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचा जोर ओसरल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत नाही. मात्र एलबीएस रोडवर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्व उपनगराप्रमाणेच ठाण्यात देखील सकाळपासून मुसळधार पाऊस बरसत आहे.

Rain : मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

Rain : मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरी पर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतेय.


अंधेरी बोरिवली दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर पाहायला मिळतेय


अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरू असल्याने आणि दुसरीकडे अधून मधून जोरदार पाऊस पडत असल्याने या वाहतूक कोंडीतून मुंबईकर मार्गस्थ होताय

नवी मुंबईसह पनवेलमध्ये पावसाच्या सरी, थोड्या वेळात मुसळधार पावसाची शक्यता

Rain : नवी मुंबई , पनवेल मध्ये पावसाच्या सरी सकाळपासून संथ गतीने पडत पाऊस.  ढगाळ वातावरण असल्यानं थोड्या वेळात मुसळधार पावसाची शक्यता

भिवंडीत सकाळपासून मुसळधार पाऊस; परिसरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी

Rain news :  भिवंडी शहर व ग्रामीण भागात सकाळ पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. परंतू मागील एका तासापासून जोरदार पाऊस पडत असल्याने  भिवंडी पुन्हा बुडाली आहे. भिवंडी शहरातील तीनबत्ती,भाजी मार्केट,बाजारपेठ परिसरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. तर अनेक दुकानात पाणी शिरल्याची घटना  घडली आहे. अनेक जन खरेदीसाठी आले असताना अचानक पावसाचे पाणी साचल्याने नागरिक देखील अडकले आहेत. तर काही जन या पाण्यातून मार्ग काढत आहेत. तसेच अनेक वाहन पाण्यात बंद झाले असून धक्का मारत बाहेर काढला जात आहे. करोडो रुपये खर्च करून महापालिकेने केलेला नालेसफाई फोल ठरली असुन नागरिक महापालिकेवर संताप व्यक्त करीत आहेत.

Mumbai Rain : मुंबईत पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Rain : मुंबईत आज सकाळपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाने सुरुवात केली असून दिवसभरात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या वतीने पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे गेटवे ऑफ इंडिया परिसरात सध्या दृश्य मानता कमी झाली असून पर्यटकांची गर्दी देखील कमी असल्याचा पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरात आज जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी असा आव्हान मुंबई महानगरपालिकेने केला आहे. 

Rain Update : संभाजीनगर जिल्हाभरात सर्वदूर पाऊस, रखडलेल्या पेरण्यांचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना दिलासा
Rain Update : जिल्ह्यातील नऊही तालुक्यात मंगळवारी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. Read More
Palghar Rain : पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस

Palghar Rain : पालघर जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. पुढील काही तासात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पहाटे वाडा पालघर या भागामध्ये जोरदार पाऊस होता. मात्र,आता ढगाळ वातावरण असून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.  

रत्नागिरीत धुवांधार पावसाची बँटींग सुरु

Ratnagiri Rain : रत्नागिरीत धुवांधार पावसाची बँटींग सुरु झाली आहे. मध्यरात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. पावसाचा फटका रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गाला बसला आहे. भंडारपुळेत पावसाचं पाणी रस्त्यावर आलं आहे. दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Rain News : मुलुंडमधील आनंदनगर टोल नाका येथे प्रचंड वाहतूक कोंडी, रस्त्यांची अर्धवट कामे

Rain News : मुलुंडमधील आनंदनगर टोल नाका येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सतत पडत असलेला पाऊस, रस्त्यांची अर्धवट कामे आणि टोल नाका यामुळं वाहतूक कोंडी झाली आहे. 

आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ताम्हानी घाटातून प्रवास करावा, प्रशासनाचं आवाहन

Rain News : रात्री आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याचा एक भाग दरीत गेला आहे. या दरडीमुळे दोन्ही बाजूला वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर, दरडी काढण्याचे काम सुरू आहे. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ताम्हानी घाटातून प्रवास करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

सलग तिसऱ्या दिवशीही भंडाऱ्यात पावसाची हजेरी, नदी-नाले ओसंडून वाहू लागले

Rain : भंडाऱ्यात सोमवारला दुपारपासून सुरू झालेला पाऊस आज तिसऱ्या दिवशीही सातत्यानं सुरू आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली असून सरासरी 80 पेक्षा अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तुमसर, लाखांदूर तालुक्यातील कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, काही घरांची पडझड झाली. मंगळवारी मेघ गर्जनेसह आलेल्या पावसात वीज पडल्यानं दोन व्यक्तींसह पाच पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे. सततच्या पावसानं नदी - नाले वाहू लागले असून आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.

महाबळेश्वर-पोलादपूर हद्दीवर मध्यरात्री महमार्गावर दरड कोसळली

Raigad Rain :  महाबळेश्वर-पोलादपूर हद्दीवर मध्यरात्री महमार्गावर दरड कोसळली आहे. यामुळं तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्य स्थितीत वाहतूक बंदच आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळं रात्री घाटातील दरड महामार्गावर आली. खाली आलेली दरड प्रशासनाकडून जेसीबीच्या साह्याने बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवरती सकाळपासूनच सुरु आहे. या महामार्गावरील वाहतूक बंद असल्यानं प्रवाशांना ताम्हाणी घाटातून प्रवास करण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates: राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान,  राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे. 


राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी


राज्यातील नागपूर, मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. 


कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज  हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.


शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत, पेरण्या खोळंबल्या


राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाया गेली आहेत. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.