Maharashtra Rain Live updates : मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
Maharashtra Rain Live updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
Beed Rain : बीड जिल्ह्यातील शिरूर गेवराई आणि केज तालुक्यामध्ये मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून केज तालुक्यातल्या माळेगाव आणि युसूफवडगाव या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आणि ओढ्यांना पूर आला होता.. तर या मुसळधार पावसामध्ये माळेगाव येथे वीज पडून एक गाय ठार झाले असून वडगाव येथील एक म्हैस पुरात वाहून गेली आहे..
Monsoon News : मुंबई (Mumbai) आणि दिल्लीत (Delhi) मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) करण्यात आली आहे. मुंबईत 11 जून रोजी मान्सून दाखल होण्याची तारीख आहे. तर दिल्लीत 27 जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, यावर्षी मुंबईत 14 दिवस उशिराने मान्सून दाखल झाला आहे तर दिल्लीत दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे.
Mumbai Rain : मुंबईत पाऊस पडला की मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असतात हे सर्वांनाच माहित आहे .मात्र याच पावसात मुंबईकर एन्जॉयही करत असतात. तेच दृश्य आज मुंबईत पहिल्या पावसानिमित्ताने मुंबईत गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळत आहे. पहिल्या पावसात फुटबॉल खेळत, तरुण आनंद लुटत आहेत
Satara Rain : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. कोयना धरणाला उपयुक्त असणाऱ्या महाबळेश्वरात तब्बल 115 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयनेमध्ये 14 आणि नवजा परिसरात 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळं धरणात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. 24 तासातील समाधानकारक पावसाने आशा पल्लवीत झाल्या आहेत.
Bhandra Rain : सुमारे 15 दिवस मृगाच्या पावसानं हुलकावणी दिल्यानंतर गुरुवारपासून भंडारा जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. शेतकरी बांधवांनी उन्हाळ्यात शेतीची मशागत करून पावसाच्या प्रतीक्षेत होते. आता पावसाचे आगमन झाले असून शेतकरी बंधवांची बी - बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.
Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकरी ज्या मान्सूनच्या प्रतिक्षेत होते त्या मान्सूनच्या सरी आता बरसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला आहे. चिपळूण, खेड, दापोली परीसरात सकाळपासूनच मान्सूनच्या सरी बरसत आहेत.
Nanded News : नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात पावसाचे आगमन झालं आहे. या वर्षातील पावसाळ्यातील हा पहिलाच पाऊस असल्याने माहूर तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरलयं. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा होती. ती आज आलेल्या पावसाने संपलीयं. माहूर तालुक्यात कुठे मध्यम तर कुठे जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसलाय. त्यामुळं उकाड्यापासून माहूर तालुक्याला काहीसा दिलासा मिळालाय.
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यात रिमझिम पावसानं हजेरी लावली. पाऊस पुढच्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुखद गारवा मिळण्याची शक्यता आहे.
23 ते 26 जून या कालावधीत दक्षिण कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज.
Nagpur Rain : आज अखेर नागपुरात पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण असून नागपूर शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. त्यामुळे गेले काही दिवस प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या नागपूरकरांना आजची सकाळ दिलासा देणारी ठरली आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार हे पाऊस मानसून पूर्व पाऊस असून मान्सून अजूनही विदर्भात सक्रिय झालेला नाही. 25 जूननंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी
राज्यातील नागपूर, मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.
कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.
शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत, पेरण्या खोळंबल्या
राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाया गेली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -