मुंबई : राज्याच्या विविध भागात गेल्या 2 दिवसात मान्सून पूर्व पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगावसह मानोरा तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाची हजेरी लावली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गेल्या तीन  दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागात कुठे हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडत आहे. तर कुठे जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. आज संध्याकाळच्या सुमारास  मानोरा, मालेगाव, कारंजा, तिन्ही तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली, यावेळी पावसामुळे उकड्यांने त्रस्त नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.


हिंगोली जिल्ह्यात झाडं उन्मळून पडलं


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रविवारी हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, सेनगाव आणि हिंगोली तालुक्यातील ग्रामीण भागात या पावसाने हजेरी लावली आहे. कळमनुरी शहरात रस्त्यावर वादळी वाऱ्याने झाड उनमळून पडले. सुदैवाने यात कोणती हानी झाली नाही, पण जुनी असलेली आणि मोठ-मोठी झाडे  या जोरदार वादळी वाऱ्याने मोडून पडली आहेत. या पावसाने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला असला तरी, या पावसामुळे शेतातील भाजीपाला आणि फळबागायतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.


मान्सून पूर्व पावसानं झोडपलं


बेळगाव शहर आणि परिसराला सलग तिसऱ्या दिवशी मान्सून पूर्व पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी अचानक आकाश अंधारून आले आणि विजांचा चमचमाट, ढगांचा गडगडाट सुरू झाला. काही वेळातच अचानक मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर असल्याने काही मिनिटातच शहरातील सखल भागात पाणी साठले. गटारींची स्वच्छता केलेली नसल्याने गटारींतील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे दिसून आले. पावसाच्या बरोबर जोरदार वारा असल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. खासबाग येथे भाजी विक्रेत्यांचे टोमॅटो पावसाच्या पाण्यात वाहून गेले. गांधीनगर ब्रीज येथे रस्त्यावर गुडघाभर पाणी साठले होते. गुडघाभर पाण्यातून मंद गतीने वाहने जात होती. पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून देखील पाणी वाहू लागल्याने वाहने संथ गतीने जात होती. पावसामुळे शेतातील मिरची आणि कोथिंबीरचे मोठे नुकसान झाले आहे.


वीज कोसळून बैल जोडी ठार


यवतमाळच्या झरी तालुक्यातील मार्की येथील दिवाकर रामदास ढेंगळे यांच्या शेतात वीज कोसळून दोन बैल आणि चार बकऱ्या ठार झाल्याची घटना रविवारी घडली. दिवाकर यांचे मुच्ची शिवारात शेत आहे. वादळी वारा आणि पाऊस आल्याने झाडाचा आसरा घेण्यासाठी लिंबाच्या झाडाच्या खाली आपल्या बैलाला बांधून ठेवले असलेल्या बैल जोडीवर वीज पडली आणि ते जागीच ठार झाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


इलेक्ट्रिक बाईकवर वीज कोसळून एकाचा मृत्यू, अवकाळी पावसामुळे गेल्या 24 तासात 5 जणांनी गमावला जीव