ठाणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जहरी टीका केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा व्हिडीओ दाखवत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. वडील चोरले म्हणता मग बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या बाईला पक्षाचे प्रवक्ते कसं केलं, असा सवाल राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत केला आहे. कळव्यात रविवारी राज ठाकरे यांनी नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य सभा पार पडली, तेव्हा ते बोलत होते.


उद्धव ठाकरेंवर टीका करत राज ठाकरेंचा लावा रे तो व्हिडीओ


आज कोण-कुणावर बोलतोय, हे सगळं सोडा. जे म्हणतात माझे वडील चोरले, त्या वडीलांबद्दल एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे, एकच. मी एकदाच मागच्या सभांमध्ये बोललो होतो, लावा रे तो व्हिडीओ, तेव्हा पासून सगळ्यांनी तेचं सुरु केलंय. आज मी पुन्हा बोलतोय, लावा रे तो व्हिडीओ, हे नीट ऐका, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा व्हिडीओ दाखवला. ठाण्याच्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.


राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर परखड टीका


सुषमा अंधारे यांचे अनेक व्हिडीओ आहेत, मला त्यांच्याशी देणं-घेणं नाही, पण ज्या माननीय बाळासाहेबाबत वक्तव्य करणाऱ्या या बाई, म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावर लढणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीच्या तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते करता, पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे, म्हणून सांगता, असा सवाल राज ठाकरे यांनी सभेतून केला आहे.


तुमचं वडिलांवरती प्रेम आहे, असं म्हणता मग...


सुषमा अंधारे यांचे अनेक व्हिडीओ आहेत, मला त्यांच्याशी देणं-घेणं नाही, पण ज्या माननीय बाळासाहेबाबत वक्तव्य करणाऱ्या या बाई, म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावर लढणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते करता, पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे, म्हणून सांगता, असा सवाल राज ठाकरे यांनी सभेतून केला आहे.


पाहा व्हिडीओ : लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओ



महत्त्वाच्या इतर बातम्या :


आनंद दिघे आणि माझे मैत्रिपूर्ण संबंध, राज ठाकरेंकडून धर्मवीरांच्या आठवणींना उजाळा; म्हणाले...