वर्धा : मानवाच्या रक्तदानानं अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर येतात. पण, प्राण्यांनाही रक्तदान करून जीवदान मिळू शकतं, ही बाब उपचारातून पुढं आली आहे. वर्ध्यात वडील रुद्र श्वानाच्या रक्तानं रॉटव्हीलर प्रजातीच्या ओरिओ श्वानाला मृत्यूच्या दारातून बाहेर येत जीवदान मिळालं आहे.
वर्ध्यातील लेनीन कांबळे यांच्या सात महिन्यांच्या रॉटव्हीलर ओरिओ नामक श्वानाची प्रकृती अचानक ढासळली. त्याला उपचारासाठी पशुचिकीत्सक डॉक्टर संदीप जोगे यांच्याकडं नेण्यात आलं. विविध चाचण्या केल्यावर ओरिओला गोचिडपासून पसरणाऱ्या इहर लिचिया नावाच्या आजाराची लागण झाल्याचं पुढं आलं. ओरिओच्या प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. हिमोग्लोबिन पातळीही थेट चारपर्यंत आली. त्याला रक्त देण्याची गरज निर्माण झाली.
याची माहिती रॉटव्हीलर प्रजातीच्या रुद्र नामक श्वानाच्या मालकाला देण्यात आली. त्यांनी रुद्रचे रक्तदान करण्यास संमती दिली. मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला ओरिओचे वडिल असलेल्या रुद्रचे रक्त देऊन जीवदान देण्यात आलं. मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला चाचणीनंतर ब्लड ट्रान्सफ्यूजन पद्धतीचा वापर करून रुद्र नामक श्वानाचं रक्त देण्यात आलं. सध्या ओरिओची प्रकृती उत्तम आहे. यापूर्वी माऊली नामक श्वानाला रुद्र नामक श्वानानेच रक्तदान करून जीवदान दिलं होतं.
माणसांकरता ब्लड बँक उपलब्ध असतात. त्यांना त्यातून रक्त मिळतं. प्राण्यांनाही रक्त देऊन त्यांचे प्राण वाचवता येतात. पण, प्राण्यांबाबत ब्लड बँक पाहायला मिळत नाही.त्यामुळं गंभीर परिस्थितीत प्राण्यांना जीवदान मिळण्याकरीता ब्लड बँकेची गरज व्यक्त होत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या :
- धक्कादायक! दोन वर्षे ना सुनावणी ना जामीन..., महिलेने तुरुंगातच दिला मुलाला जन्म
- Gay couple Marriage: तेलंगनातील पहिल्या 'गे कपल'चं थाटात लग्न; म्हणाले, 'आम्ही करुन दाखवलं'
- आपके बुरे दिन जल्द आएंगे! जय बच्चन राज्यसभेत संतापल्या, सत्ताधाऱ्यांना शाप