हैदराबाद : तब्बल आठ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तेलंगनातील गे कपल (Gay couple Marriage) म्हणजे समलैंगिक जोडपे लग्नाच्या बेडीत अडकलं. आपल्या परिवार आणि खास मित्रांसोबतच्या एका खासगी कार्यक्रमात 18 डिसेंबरला हा लग्नसोहळा पार पडला. या 'मी करुन दाखवलं' अशी भावना या कपलने व्यक्त केली. सुप्रियो चक्रवर्ती (31) आणि अभय डांगे (34) असं या कपलचे नाव आहे. 


भारतात ज्यावेळी गे मॅरेज अवैध होतं त्यावेळी या दोघांनी 'प्रॉमिसिंग सेरेमनी'चे आयोजन केलं होतं. आता ते लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या दोघांनी एकमेकांना अंगठ्या एक्सचेंन्ज केल्या. या लग्नानंतर सुप्रियो चक्रवर्ती म्हणाले की, या लग्नाची नोंद करण्यात आली नाही. आमच्या लग्नात परिवारातील लोक आणि खास मित्र आले होते. या लग्नाला त्यांचे काही एलजीबीटीक्यू समुदायातील मित्रही आले होते.


 




संबंधित बातम्या :