ST Strike Update : मागील जवळपास दोन महिन्यांपासून सुरु असलेला राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. त्यात या संपाने आज नवं वळण घेतलं आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेनं सोमवारी (20 डिसेंबर) मंत्रालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेतली. ज्यानंतर संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी त्यांच्याकडून एसटी संप मागे घेतल्याचे जाहीरही केले. पण एसटी विलगीकरणाच्या मागणीच्या पूर्ततेशिवाय माघार घेतल्याने इतर संपकरी आक्रमक झाले असून हा संप अजूनही मागे घेतली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान गुजर यांनी संपातून माघार घेतल्याने संपात फूट पडल्याच्या चर्चेलाही उधान आलं आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत अनिल परब यांच्यासह महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महा व्यवस्थापक माधव काळे आणि अध्यक्ष अजय गुजर हे उपस्थित होते. दरम्य़ान जवळपास सहा तास चाललेल्या बैठकीनंतर परब यांनी दिलेल्या माहितीत, चर्चेतून प्रश्न सुटतील असं सांगत संप माग घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी त्यांच्याकडून संप मागे घेतल्याचे जाहीर केले. शिवाय विलनीकरणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम असून याबाबत राज्यसरकारशी चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले.
संपकरी आक्रमक
दरम्यान गुजर यांच्या संपातून माघार घेण्यानंतर आझाद मैदानात उपस्थित अनेक संपकऱ्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या. यावेळी विलणीकरणाच्या मुद्द्याशिवाय संप मागे घेणार नाही. या एकमेव मागणीवर ठाम असल्य़ांचं अनेकांनी सांगतिलं. तसंच एका संतप्त महिला आंदोलकाने एक लाख संपकऱ्यांचा जीव गेला तरी आम्ही दुखवटा चालूच ठेवू असंही म्हटंल आहे.
अनिल परब काय म्हणाले?
चर्चेनंतर अनिल परब यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, 'ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, ते कर्मचारी जर कामावर पुन्हा रूजू झाले तर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. तसंच फौजदारी गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले आहेत त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कारवाई मागे घेण्यात येणार आहे. शिवाय आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्यांची सर्व प्रकरणे तपासून त्याचा अहवाल तयार करुन त्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत विचार केला जाणार आहे. 22 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर दाखल व्हावं, ज्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास बाहेरगावी असल्यानं उशीर होईल त्यांना एक दिवसाची सवलत देण्यात येईल. दरम्यान कर्मचाऱ्यांनी कामावर यावं चर्चेतून प्रश्न सुटू शकतात.'
सदावर्ते आंदोलनावर ठाम
एकीकडे कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे अॅड. गुणरत्ने सदावर्ते हे आंदोलनावर ठाम आहेत. विलिनीकरणाची मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका सदावर्तेंनी घेतली आहे. त्यावर बोलताना अजय गुजर म्हणाले की, "आम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहोत, पण समितीच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. गुणरत्न सदावर्ते हे आमचे वकील आहेत. जर त्यांना आमची भूमिका मान्य नसेल, त्यांना आमची केस लढायची नसेल तर आम्ही दुसरा वकील बघू." दरम्यान याआधी कोर्टात सुनावणीदरम्यान 'अजय गुजर यांची किमान वेतन श्रेणी एसटी कामगार संघटना नोंदणीकृत आहे मात्र मान्यताप्राप्त नाही. शिवाय याचे केवळ दोन सदस्य आहेत.' अशी माहिती कोर्टात सदावर्ते यांनी दिली होती.
संबंधित बातम्या :
- ST Workers Strike : विद्यार्थ्यांचा त्रास दूर व्हावा असं वाटत नाही का?, हायकोर्टाचा एसटी कर्मचाऱ्यांना सवाल
- Dhule: मेस्मा कायद्याची बातमी ऐकून एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मृतदेह घेऊन नातेवाईक विभागीय कार्यालयात
- Ajit Pawar : एसटी कर्मचाऱ्यांनो, सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा... अजित पवारांचा इशारा