Legislative Council MLAs swearing ceremony : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेत निवडणुकीमध्ये (Legislative Council MLAs swearing ceremony) जिंकून आलेल्या 11 विधानपरिषद सदस्यांचा आज शपथविधी पार पडत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी 11 विधानपरिषद सदस्यांना आज शपथ (Legislative Council MLAs swearing ceremony) दिली आहे. विधान भवन येथे विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ ग्रहण सोहळा पार पडला. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना संधी देण्यात आली होती. विधानपरिषदेसाठी भावना गवळी (Bhavana Gawali) आणि कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. खासदारकीला तिटीटन मिळाल्याने या नेत्यांना आमदारकीला उभं करण्यात आलं होतं. आज शपथविधीवेळी (Legislative Council MLAs swearing ceremony) भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर, जय महाराष्ट्र, जय एकनाथ असे म्हटले आहे.
पाच वेळच्या खासदार भावना गवळींचं या लोकसभेत तिकीट कापलं
शिवसेना शिंदे गटाच्या पाच वेळच्या खासदार भावना गवळी या यावेळीही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार होत्या. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळे यावेळी त्यांनाच तिकीट मिळणार अशी चर्चा असताना भाजपने मात्र त्यांच्या नावाला विरोध केला. त्यामुळे त्याचं तिकीट कापण्यात आलं आणि ते हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना देण्यात आलं. या ठिकाणीही महायुतीच्या उमेदवारला पराभवाचा धक्का बसला आहे. मात्र विधानपरिषदेत (Legislative Council MLAs swearing ceremony) भावना गवळींना उमेदवारी दिली होती. त्या आमदार म्हणून निवडून देखील आल्या आहेत, आज त्यांचा शपविधी पार पडला यावेळी त्यांनी संधी देणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांचे देखील नाव घेतले आहे.
आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतना बाळासाहेबांना नमन करत मानले ठाकरेंचे आभार
शिवसेना ठाकरे गटाचे नवे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेत असताना बाळासाहेबांना नमन करून आपल्या शपथविधीला सुरूवात केली आहे. तर आपल्या शपथविधीच्या शेवटी त्यांनी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराचे देखील आभार मानले आहेत.
कोण कोणत्या आमदारांनी घेतली शपथ
1- पंकजा मुंडे - भाजप
2- योगेश टिळेकर - भाजप
3- अमित गोरखे - भाजप
4- परिणय फुके - भाजप
5- सदाभाऊ खोत - भाजप
6- भावना गवळी - शिंदे शिवसेना
7- कृपाल तुमाने - शिंदे शिवसेना
8- शिवाजी गर्जे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
9- राजेश विटेकर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
10- प्रज्ञा सातव - काँग्रेस
11- मिलिंद नार्वेकर - उद्धव ठाकरे पक्ष