Bacchu Kadu on Shetkari Aghadi : नागपूर : येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची चिन्ह आहेत. प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी मोठी घोषणा सध्या शिंदेंसोबत असलेल्या बच्चू कडू यांनी केली आहे. तसेच, येत्या 9 ऑगस्टला सभेत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहितीही यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी दिली आहे. त्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनाही बच्चू कडू यांनी शेतकरी आघाडीत येण्यासाठी खुलं आमंत्रण दिलं आहे. जरांगेंना शेतकरी आघाडीत यायचं असेल तर त्याचं स्वागत आहे, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. 


प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी बोलताना सांगितलं की, "येत्या विधानसभा निवडणुकीत आमची तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी असेल. 9 ऑगस्टला संभाजी नगर येथे आम्ही सभा ठेवली आहे. त्यात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू." तसेच, पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "मनोज जरांगे यांना शेतकरी आघाडीत यायचं असेल, तर त्याचं स्वागत आहे." त्याचप्रमाणे, आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सारखेच असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. 


पाहा व्हिडीओ : Bacchu Kadu Nagpur : विधानसभेला आता 'शेतकरी आघाडी',जरांगे पाटील येणार असल्यास स्वागत