Truck Driver Strike LIVE: हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस, राज्यात अनेक पंपांवर रांगा

Truck Driver Strike Petrol Shortage : हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं राज्यात अनेक पंपांवर रांगा

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 02 Jan 2024 02:47 PM
Nagpur Petrol Update : जनतेने घाबरून जाऊ नये, नागपूर जिल्ह्यात मुबलक पेट्रोल आणि गॅस साठा - जिल्हाधिकारी

नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या डेपोमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे. गरज पडल्यास पोलीस संरक्षणात पेट्रोल पुरवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी इंधन संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Nagpur Truck Strike : नागपुरात ट्रक आणि टँकर चालकांनंतर आता टॅक्सी चालक, ओला-उबेर चालकांचाही संप

नागपुरात ट्रक आणि टँकर चालकांच्या संपामध्ये आता टॅक्सी चालक, ओला-उबर चालकही उतरले आहेत, त्यामुळे एका बाजूला चर्चेतून संपाबद्दलचा तोडगा निघावा आणि ट्रक-टँकरद्वारे होणारा अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्ववत व्हावा, यासाठी सरकार प्रयत्न करत असतानाच, टॅक्सी आणि ओला-उबर चालकांनीही संप पुकारला आहे. नागपुरात आज खाजगी टॅक्सी चालकांनी मोर्चा काढत सरकारच्या हिट अँड रन संदर्भात केलेल्या नव्या कायदेशीर तरतुदींचा जोरदार विरोध केला. "आमचे वेतनच 10 हजार ते 15 हजार असते, त्यामध्ये आम्ही लाखो रुपयांचा दंड कसा भरायचा??सरकारने केलेला कायदा अन्यायकारक आहे," असं मत यावेळी आंदोलन करणाऱ्या टॅक्सी चालकांनी व्यक्त केला आहे.

Nashik truck strike Update : ट्रक चालकांच्या संपला खाजगी कार चालकांचा पाठिंबा

नाशिक : ट्रक चालकांच्या संपला खाजगी कार चालकांचा पाठिंबा. टुरिस्ट कार चालकांनी उपसले संपाचे हत्यार. केंद्र सरकारचा कायदा चालकविरोधी असल्याचा आरोप करत कायद्याला विरोध, कायदा मागे घेतला नाही तर नाशिकमधे येणाऱ्या टुरिस्ट गाड्या अडविण्याचा इशारा, पोलिस प्रशासन काय भूमिका घेणार याकडं लक्ष

Truck Driver Strike : मनमाड इंधन प्रकल्पात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक सुरु; संपावर तोडगा निघणार का?

मनमाड इंधन प्रकल्पात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत वाहतूकदार संघटनांची बैठक सुरु झाली असून या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उपम देखील उपस्थित आहेत. वाहनचालक प्रकल्पांबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. टँकर चालकांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी काल दोन बैठका घेण्यात आल्या. मात्र दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या. त्यामुळे आज पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीस सुरुवात झाली आहे. आंदोलक अजूनही आपल्या मागण्यांवर कायम आहे. हिट अँड रन कायदा मागे घ्या, नाहीतर आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. या बैठकीत काही तोडगा निघणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. 

Vasai : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पोलीस ऍक्शन मोडवर

पोलीस महामार्गाच्या किनाऱ्यावर उभ्या असलेले सर्व ट्रक, अवजड वाहनं बाजूला करून रस्ता मोकळा करत आहेत. काल महामार्गावर वाहन उभी करून अचानक ट्रकचालकांनी आंदोलन करून हिंसक वळण धारण केलं होतं. आज पुन्हा ती परिस्थिती उद्भवून कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस सर्व वाहनांना बाहेर काढत आहेत.

Dada Bhuse : संपावर लवकरच तोडगा निघेल, नागरिकांनी घाबरून जावू नये; पालकमंत्री भूसेंचे आवाहन

पेट्रोल-डिझेल पंपावर आज संपाचा काहीअंशी परिणाम झालेला आहे. तसेच इतर वाहतुकीवरदेखील परिणाम झाला आहे. मात्र या संदर्भात लवकरच तोडगा निघेल. नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. आवश्यकता असेल तरच इंधनाचा साठा करा. जेणेकरून गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही. सरकारचे संबंधित संघटनेशी बोलणे सुरू आहे. नागरिकांची गैरसोय थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पानेवाडीला जावून संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत. यातून नक्कीच सकारात्मक तोडगा निघेल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

Nagpur Truck Driver Strike: नागपुरात पेट्रोलसाठी वाहनधारकांच्या लांब रांगा; अनेक पेट्रोल पंप बंद असल्याचे चित्र

Nagpur Truck Driver Strike : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्यातील घातलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपामुळे राज्यातील पेट्रोलपंपांचा इंधन साठा संपला आहे. यामुळे अनेक ठिकाणी मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या संपामुळे नागपूर शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पंपावर असलेलं पेट्रोल संपेल या भीतीपोटी पेट्रोल मिळवण्यासाठी वाहनधारक पेट्रोल पंपावर गर्दी करू लागले आहेत. काल रात्रीपासूनच नागपुरातील  पेट्रोल पंपांबाहेर पट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, आज सकाळपासूनही पेट्रोल पंपांमधील इंधनाचा साठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप आज बंद असल्याचे बघायला मिळाले. या संपामुळे चकरमान्यांचे हाल होत असून नववर्षांच्या सुरवातीलाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना उमटतांना दिसत आहे. 

Eknath Shinde: वाहतूकदारांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Eknath Shinde : वाहतूकदारांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत . कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.  संपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती केंद्राला दिली जाणार आहे. 

Truck Driver Strike : धुळ्यात नागरिकांची मोठी गैरसोय

धुळे शहरात सकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसून येत आहे. केंद्र सरकारने मोटर कायद्यामध्ये त्वरित बदल करून वाहक व चालकांच्या मागण्या पूर्ण करून संप मिटवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरुन पेट्रोलमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याची देखील केंद्र सरकारने काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया यावेळी धुळे शहरातील पेट्रोल पंपचालक शशांक महाले यांनी दिली. पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांना दोन-तीन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

Nashik Petrol Shortage : नाशिक जिल्ह्यातील पेट्रोल पंप ड्राय होण्यास सुरुवात

नाशिकच्या मनमाडजवळील नागापूर व पानेवाडी इंधन प्रकल्पातून होणारी इंधनाची वाहतूक बंद असल्याने उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा व विदर्भातील पाच -सहा जिल्ह्यांना होणारा पेट्रोल-डिझेलचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील पेट्रोल पंप ड्राय होण्यास सुरुवात झाली आहे. काल संपावर दोन बैठका झाल्या मात्र निष्फळ ठरल्या. त्यामुळे आजही संप सुरूच आहे. आता कायदा कोणी हातात घेणार नाही याची काळजी घ्या, पानेवाडी प्रकल्पातील इंधन टँकर पोलीस बंदोबस्तात बाहेर काढा, असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशानासाला दिले आहे.

Mumbai Truck Driver Strike: मुंबईत पेट्रोलसाठी वाहनधारकांच्या रांगा 

Mumbai Truck Driver Strike: मुंबईतही या संपाचा परिणाम आता मुंबईतही दिसून येत आहे. काही दिवस पेट्रोलच्या टंचाईला जाण्याच्या भीतीने मुंबईतील कुर्ल्यातील पेट्रोल पंपावर काही लोकांनी ड्रममध्ये पेट्रोल भरुन नेलं. पेट्रोलबाबत व्हॉट्सअॅपवर मेसेज आल्याचं काही जणांनी सांगितलं. त्यानंतर पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी झाली.

Petrol Shortage : ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना

Petrol Shortage : हिट अँड रन कायदा विरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या सुरू केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे संपामुळे अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करण्यासाठी असलेल्या स्कूलबस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूल बसेस रस्त्यावर धावणार नाही, असं स्कूल बस मालकांनी सांगितलं आहे. 

Truck Driver Strike: हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस

Truck Driver Strike Petrol Shortage : मुंबई : हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर मोठ्या रांगा लावल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाकडे दोन दिवस पुरेल एवढाच डिझेलचा पुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे ट्रकचालकांच्या संपाचा एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. 

पार्श्वभूमी

Truck Driver Strike Petrol Shortage : मुंबई : हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर मोठ्या रांगा लावल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाकडे दोन दिवस पुरेल एवढाच डिझेलचा पुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे ट्रकचालकांच्या संपाचा एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. 


ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना


हिट अँड रन कायदा विरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या सुरू केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे संपामुळे अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करण्यासाठी असलेल्या स्कूलबस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूल बसेस रस्त्यावर धावणार नाही, असं स्कूल बस मालकांनी सांगितलं आहे. 


मुंबईत पेट्रोलसाठी वाहनधारकांच्या रांगा 


मुंबईतही या संपाचा परिणाम आता मुंबईतही दिसून येत आहे. काही दिवस पेट्रोलच्या टंचाईला जाण्याच्या भीतीने मुंबईतील कुर्ल्यातील पेट्रोल पंपावर काही लोकांनी ड्रममध्ये पेट्रोल भरुन नेलं. पेट्रोलबाबत व्हॉट्सअॅपवर मेसेज आल्याचं काही जणांनी सांगितलं. त्यानंतर पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी झाली.


नांदेडमधील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी


ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारल्यानंतर पेट्रोल पंपावर आज सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी पाहिला मिळत आहे. नांदेडमध्ये काही पेट्रोल पंपावर 2 दिवस पुरेल एवढा इंधनाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळपासून वाहनधारकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी पाहिला मिळत आहे. 


नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल पंपवर मोठी गर्दी


केंद्र सरकारनं मोटर अपघात कायद्यात बदल करून त्यात सुधारणा केली आहे. या विरोधात देशभरातील वाहनचालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या कारणावरून देशभरातील वाहतूकदार आणि चालकांनी संप पुकारला आहे. त्यात पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारे सहभागी झाले आहेत. हे आंदोलन किती दिवस चालणार? हे निश्चित नाही, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होणार नाही, यामुळे एक दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदीसाठी गर्दी करत असल्याचं चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. सकाळपासूनच पेट्रोल पंप मोठी गर्दी दिसून येत आहे.


राज्य सरकारचे जिल्हा प्रशासन, पोलिसांना आदेश


राज्यात पेट्रोल तुटवडा होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सगळ्याच जिल्ह्यात पेट्रोलपंपावर वाहन चालकांची गर्दी उसळली आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना शासनाकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. त्याशिवाय, तेल कंपन्यांना आवश्यक सहकार्य करा अशी सूचना देण्यात आली आहे. संपात सहभागी वाहतूकदारांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत. 


नव्या कायद्यात आक्षेप कशावर?


नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. भारतात 28 लाखांहून अधिक ट्रक चालक 100 अब्ज किलोमीटरचे अंतर कापतात. या ट्रकवर 50 लाखांहून अधिक लोकं काम करतात. अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे रस्ते अपघातही सर्रास घडत आहेत. त्यामुळेच सरकारने नवीन कायदा आणला असल्याचं बोललं जात आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.