एक्स्प्लोर

Ministers Bungalow Renovation : मंत्र्यांच्या बंगल्यावर  30 कोटींचा खर्च, पाचच महिन्यापूर्वी नुतनीकरण, आता पुन्हा उधळपट्टी

Ministers Bungalow Renovation : सर्वसामान्यांच्या करातून उभ्या करण्यात आलेल्या पैशाची उधळपट्टी ही मंत्र्यांच्या घरांवर केली जात असल्याचं समोर आलं आहे. 

Ministers Bungalow Renovation : राज्य सरकारकडून मंत्र्यांच्या बंगल्यावरती पैशांची उधळपट्टी सुरु असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. या सर्व बंगल्यांचं पाचच महिन्यांपूर्वी नुतनीकरण करण्यात आलेल होतं. आता पुन्हा एकदा तब्बल 30 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. खरं तर मंत्री वास्तव्याला आल्यानंतर हा खर्च करण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा 30 कोटी रुपयांच नुतनीकरण करण्यात येत आहे. यापैकी जवळपास 60 टक्के काम न करता, परस्पर पैसे काढल्याचा आरोप करण्यांत आलाय.

कोणत्या मंत्र्याच्या कुठल्या बंगल्यावरती किती खर्च करण्यात आला?

  • सुधीर मुनगंटीवार- पर्णकुटी, 1 कोटी 50 लाख
  • गुलाबराव पाटील- जेतवन 1 कोटी 15 लाख
  • राधाकृष्ण विखे पाटील- रॉयल स्टोन, 1 कोटी 58 लाख
  • अतुल सावे, शिवगड, 1 कोटी 4 लाख
  • अजित पवार- देवगिरी, 19 लाख 89 हजार
  • दीपक केसरकर- रामटेक, 75 लाख 42 हजार
  • तानाजी सावंत- लोहगड,  87 लाख 46 हजार
  • बाळासाहेब भवन- ब्रह्मगिरी, 1 कोटी 57 लाख
  • चंद्रकांत पाटील- सिंहगड, 52 लाख 37 हजार
  • राहुल नार्वेकर- शिवगिरी, 42 लाख
  • विजयकुमार गावित- चित्रकूट, 1 कोटी 54 लाख
  • उदय समंत- मुक्तागिरी, 1 कोटी १६ लाख
  • संदिपान भुमरे- रत्नसिंधू , ३७ लाख 26 हजार
  • दिलीप वळसे पाटील- सुवर्णगड 73 लाख
  • अब्दुल सत्तार- पन्हाळगड, 50 लाख
  • अदिती तटकरे- प्रतापगड , 35 लाख 19 हजार.

मंत्र्यांचे बंगले आणि त्यांचा वार्षिक देखभाल त्यासाठी 1 कोटी 26 लाख रुपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. 

मंत्र्यांच्या बंगल्यांवरती लाखो रुपयांची उधळपट्टी केल्यानंतरही मंत्रालयाच्या समोरच्या बंगल्यांचं रंगकाम करण्यासाठी 1 कोटी 5 लाखांच्या स्वतंत्र निविदा करण्यात आले आहेत. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रायगड बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 75 लाखाच्या निविदा काढल्या तर आहेतच, मात्र स्टेशनरीसाठीसुद्धा 57 लाखांच्या निवेदन करण्यात आल्या आहेत. 

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या बंगल्यावरही खर्च

महायुतीच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर झालेल्या खर्चाबद्दल प्रश्न विचारला असता राज्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च करणे, त्याचा मेंटेनन्स ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया असते. हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीनं करण्यात येतं. त्यावर काही आक्षेप घेण्यासारखं नाही. महाविकास आघाडीच्या काळातील मंत्रांच्या घरावर किती खर्च झाला याचासुद्धा तपशील मी तुम्हाला देईन.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget