एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्र एसआयटी परशुराम वाघमारेची चौकशी करणार
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली देणाऱ्या परशुराम वाघमारेचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी बंगळुरुला जाऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
मुंबई/पुणे : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीकडून परशुराम वाघमारेची चौकशी होणार. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली देणाऱ्या परशुराम वाघमारेचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी बंगळुरुला जाऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
एसआयटीचे अधिकारी कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात आहेत. गौर लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आधी मे महिन्यात तिघांना अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरुला जाऊन त्यांची चौकशी केली होती. आता परशुराम वाघमारेचीही चौकशी करण्यासाठी एसआयटीची टीम जाणार आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरलेली बंदूकच एमएम कलबुर्गी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी वापरल्याचं कर्नाटक पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर सांगितलं.
पानसरे यांच्या हत्येसाठी दोन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता. त्यातील एक पिस्तुल गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आली, तर दुसरी पिस्तुल डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आल्याचं कर्नाटक पोलिसांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर पोलीस आणि महाराष्ट्र एसआयटी कर्नाटक एसआयटीच्या संपर्कात असून, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संशयित वाघमारे याचा ताबा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
कोण आहे हा परशुराम वाघमारे?
परशुराम अशोक वाघमारे असं त्याचं पूर्ण नाव. वय वर्षे 26. विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्याचा तो रहिवासी. बसव नगरात त्याचं घर आहे. आईवडील दोघेही मजुरी करून घर चालवतात. आई भांडे विकते तर वडील मिळेल तिथं काम करतात.
एकुलता एक मुलगा असल्याने घरी परशुरामचे लाड व्हायचे. नावाला त्याने बीएससी डिप्लोमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. पण हिंदुत्ववादी विचाराने तो कमालीचा प्रेरीत झाला होता. हिंदुत्वासाठी वाटेल ते करण्याची त्याची तयारी होती. त्यातच महाराष्ट्रातल्या अमोल काळे याच्याशी त्याचा संपर्क झाला. धर्म रक्षण्यासाठी प्रसंगी जीवही घ्यायची तयारी त्याने केली. बेळगावात डोंगरावर, रानावनात जाऊन मित्रांच्या साथीने एअरगन चालवण्याच प्रशिक्षण घेतलं आणि गौरी लंकेश यांचा काटा काढला. पण एका महिलेला मारलो याचा त्याला नंतर पश्चाताप झाला.
परशुरामची पार्श्वभूमी सुद्धा तेवढीच वादग्रस्त आहे. त्याला काही करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय होती. त्यासाठी तो सामाजिक शांतता बिघडवण्याच्या कामात व्यस्त असायचा. मशिदीवर ओम लिहिणे, मंदिरावर चाँद काढणे, स्वतःच पाकिस्तानचा झेंडा रोवून तो नंतर जाळणे अशी कृत्ये तो करायचा.
2012 साली याच सिंदगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात समाजविघातक कृत्ये केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. प्रमोद मुतालिक यांनी श्रीराम सेना काढली, तेव्हा सिंदगी तालुक्यातील श्रीराम सेनेच्या विद्यार्थी संघटनेची जबाबदारी तो पार पाडायचा.
परशुराम याचं कुटुंब अत्यंत साधं, गरीब आणि कष्टकरी आहे. वडील अशोक आणि आई जानकी हा त्याचा परिवार. गेल्या काही वर्षांपासून त्याचे आईवडील रायचूर जिल्ह्यातील मानवी गावात कामासाठी वास्तव्याला आहेत. परशुराम कॉलेज शिकत असल्याने तो सिंदगी गावातच राहिला. अर्थार्जन करण्यासाठी म्हणून त्याने नेट कॅफे सुरू केला. या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तो लोकांना मिळवून द्यायचा. पण असं काही विपरीत काम करेल याची कल्पना परशुरामच्या आईवडिलांना नव्हती. गौरी लंकेश हत्या प्रकरणात परशुरामला झालेली अटक त्यांच्यासाठी धक्का होता.
परशुराम यांच्या दोन अन्य साथीदारांना सुद्धा एसआयटीने ताब्यात घेतलंय. परशुरामने चालवलेल्या बंदुकीतून गौरी लंकेश यांची हत्या झाली हे आता उघड झालंय. पण त्याच्या हाती बंदूक देऊन, त्याचा माथा भडकवणारे सूत्रधार शोधणं त्याहून जास्त महत्वाचं आहे. कदाचित त्याची पाळंमुळं दाभोळकर, पानसरे हत्याकांडात रोवली गेली असावीत.
संबंधित बातम्या :
कोण आहे परशुराम वाघमारे?
धर्म वाचवण्यासाठी गौरी लंकेश यांची हत्या, परशुराम वाघमारेची कबुली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement