Thackeray vs Shinde Case : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आता सोमवारी निर्णय; आजच्या सुनावणीतील महत्वाचे 10 मु्द्दे
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आजची सुनावणी संपली असून आता 8 ऑगस्ट, सोमवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज (गुरुवारी) पुन्हा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) कपिल सिब्बल (Kapil Sibbal), अभिषेक मनु सिंघवी (Abhishek manu Singvi) तर शिंदे गटाकडून (CM Eknath shinde) हरीश साळवे (Harish Salve) यांनी युक्तिवाद केला तर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अरविंद दातार यांनी युक्तिवाद केला. कालच्या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली होती. यावर आज कोर्टानं महत्वाचा निर्णय दिला. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, असे आदेश सुप्रीम कोर्टाने आयोगाला दिले आहेत. दरम्यान आजची सुनावणी संपली असून आता 8 ऑगस्ट, सोमवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
आजच्या सुनावणीतील दहा महत्वाचे मुद्दे
1. अकरा वाजेच्या सुमारास कोर्टात सुनावणी सुरु, शिंदे गटाकडून हरीश साळवेंचा युक्तिवाद, पक्षविरोधी काम करताहेत या स्वत:च्या धारणेवरुन सदस्यांना अपात्र ठरवू शकतात का? साळवेंचा सवाल
2. पक्षांतरबंदी कायदा पक्षांतर्गत मतभेदांशी निगडीत नाही, हरीश साळवेंचा युक्तिवाद; यावर सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, मग व्हिपचा अर्थ काय?
3. राजकीय पक्षाला आपण पूर्णपणे दुर्लक्षित करु शकत नाही, सरन्यायाधीशांचं मत तर बंडखोरांनी पक्ष सोडलेला नाही, असा हरीष साळवेंचा युक्तिवाद, पात्रतेच्या निर्णयाला विलंब झाल्यास आतापर्यंच्या निर्णयांचं काय? अध्यक्षांविरोधात आवाज उठवणं नवीन नाही,शिंदे गटाचे वकील हरीष साळवेंचा युक्तिवाद यावर राजकीय प्रश्न असल्याने निवडणूक आयोगाला कसं रोखू शकतो? कोर्टाचा सवाल
4. आमच्यासाठी बंडखोर आमदार अपात्र, अपात्र ठरलेले लोक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत, ठाकरे गटाकडून सिब्बल यांचा युक्तिवाद; दोन गट मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाहीत का? कोर्टाचा सवाल
5. बंडखोरांकडून राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यात गल्लत केली जातेय, सिब्बल यांचा युक्तिवाद
6. दहावी सूची आणि आयोगाचं कार्यक्षेत्र वेगळं, विधिमंडळातील घडमोडींचा राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाशी संबंध नाही, निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार यांचा युक्तिवाद
7.दहावी सूची निवडणूक आयोगाला लागू होत नाही, निवडणूक आयोग स्वतंत्र घटनात्मक संस्था, निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार यांचा युक्तिवाद
8. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, सुप्रीम कोर्टाचे आयोगाला आदेश, आजची सुनावणी संपली
9.सर्वांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, याचिका मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय : सुप्रीम कोर्ट
10. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता सोमवार, 8 ऑगस्ट रोजी सुनावणी, आयोगानं नोटिशीबाबत वेळ वाढवून द्यावा, अशा सुप्रीम कोर्टाच्या सूचना
इतर महत्वाच्या बातम्या
Thackeray vs Shinde Case LIVE : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता 8 ऑगस्ट रोजी सुनावणी, आजची सुनावणी संपली