एक्स्प्लोर

RTO : आरटीओ कार्यालयातील चकरा थांबणार; एजंटला पैसे देण्याची गरज नाही, सहा सुविधा फेसलेस होणार

आजपासून आरटीओ संबंधित पत्ता बदल, डुप्लिकेट आरसी बुक, डुप्लिकेट लायसन्स यासह काही सुविधा या फेसलेस होणार आहेत. 

मुंबई : पूर्वी वाहनासंबधीत आणि लायसन्स संबधीत कामे करण्यासाठी आरटीओ कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आरटीओची कामं म्हटलं की कानाला हात लावायचे. मात्र आता आरटीओमधील काही कामे आरटीओत न जाता करता येणार आहेत. परिवहन विभागात वाहनाच्या आणि अनुज्ञप्तीच्या (लायसन्स) प्रत्येकी तीन अशा एकूण सहा सेवा आता फेसलेस होणार आहेत. परिवहन विभागाच्या वतीने फेसलेस सेवेचा शुभारंभ  मंत्री (परिवहन) अनिल परब यांच्या शुभहस्ते परिवहन आयुक्त कार्यालयात आज झाले आहे.  

आता ही कामे आरटीओमध्ये न जाता होणार ; काय काय फेसलेस होणार ?

1. आरटीओमधील वाहनांच्या या सेवा : वाहन कागदपत्रांवरील पत्ता बदल, डुप्लिकेट आरसी बुक,  स्थानांतर noc

2. लायन्ससच्या या सेवा : पत्ता बदल, रिनीव्हल ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स, डुप्लिकेट लायसन्स

जवळपास 17 ते 18 लाख लोकांच्या वर्षभरातील आरटीओच्या फेऱ्या वाचणार आहेत. पूर्वी या सुविधा ऑनलाइन होत्याच मात्र एकदातरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी त्या व्यक्तीला आरटीओ कार्यालयात जावे लागत असे. मात्र या पुढे या सेवांसाठी आता आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही सर्व ऑनलाइनच होणार.

फेसलेस सेवेमुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाऊन एजंटला पैसे देण्याची गरज पडणार नसून. येत्या काळात आरटीओ कार्यालयातील नागरिकांची गर्दी कमी होण्यात मदत होणार आहे. सद्यःस्थितीत अनेक सेवांसाठी लागणाऱ्या क्लिष्ट कागदपत्रांमुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. काही जण एजंटचा पर्याय स्वीकारतात. मात्र आता नागरिकांना घरबसल्या आपल्या अँड्रॉईड मोबाईल किंवा संगणकाद्वारे आपली आरटीओमधली काम करता येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि तो लिंक असलेला मोबाईल क्रमांक सर्वाधिक महत्त्वाचा आहे. 

केंद्र सरकारने गेल्यावर्षी 18 सोयी फेसलेस करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार महाराष्ट्र परिवहन विभागाने आता फेसलेस सुविधेवर भर दिला आहे. त्यात आता एनआयसी मार्फत 6 सुविधा फेसलेस केल्या गेल्या आहेत पुढे ही अनेक सुविधा दिल्या जातील असे परिवहन आयुक्तांनी सांगितले. आज मुंबईत सहा फेसलेस सुविधांच परिवहन विभाग कार्यालयात  शुभारंभ झाला .यावेळी महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयातील अधिकारी ऑनलाइन जोडले गेले होते.

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Mayor Bungalow: रितू तावडेंचा राजालाही लाजवेल असा थाट, महापौर बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी पैशांची वारेमाप उधळपट्टी थांबेना, 3 कोटींचं नवं टेंडर काढलं
रितू तावडेंचा राजालाही लाजवेल असा थाट, महापौर बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी पैशांची वारेमाप उधळपट्टी थांबेना, 3 कोटींचं नवं टेंडर काढलं
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Embed widget