MARD Strike LIVE UPDATE  : राज्यातील 'मार्ड'चे डॉक्टर बेमुदत संपावर, वाचा महत्वाचे अपडेट

Mard Doctor Strike  :  आजपासून राज्यातील मार्डचे डॉक्टर बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य सरकारकडून लेखी आश्वासन न मिळाल्यानं मार्डच्या डॉक्टरांनी आजपासून संपाची हाक दिली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Oct 2021 01:59 PM
सोलापुरातही अनेक डॉक्टर संपावर

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आज पासून संप पुकारला आहे. निवासी डॉक्टरांची संघटना मार्डच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे. कोविड काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी प्रामाणिकपणे रुग्णसेवा केली. त्यामुळे शासनाने निवासी डॉक्टरांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात याचे पालन केले नाही. त्याविरोधात मार्डच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जवळपास १८० निवासी डॉक्टर आहेत. त्यापैकी बहुतांश निवासी डॉक्टर्स या संपात सहभागी होत आहेत. शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेचा मुख्य भार हा त्यांच्यावरच असतो. हेच डॉक्टर्स संपावर गेल्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मात्र तात्काळ सेवा, कोव्हीड सेवा यावर कोणतेही परिणाम होणार नाही याची खबरदारी घेतली जात असल्याची माहिती देखील संप पुकारलेल्या डॉक्टरांनी दिली. 

मार्डच्या प्रतिनिधींसोबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख चर्चा करणार 

मार्डच्या प्रतिनिधीसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख चर्चा करणार. आज सकाळपासून सुरू झालेल्या निवासी डॉक्टरांच्या संपाला मिळणारा पाठींबा पाहता राज्य सरकार निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर चर्चा करणार. निवासी डॉक्टर संपावर गेल्याने पडत असलेला रुग्णसेवेवरील ताण पाहता संप मागे घ्यावा अशी वैद्यकिय शिक्षण विभागाकडूज विनंती. जोपर्यंत, लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मार्ड डॉक्टर संपावर ठाम

पार्श्वभूमी

Mard Doctor Strike  :  आजपासून राज्यातील मार्डचे डॉक्टर बेमुदत संपावर जाणार आहेत. डॉक्टरांचा संप होऊ नये म्हणून सेंट जॉर्ज रुग्णालयात प्रशासन आणि निवासी डॉक्टरांची 2-3 तास चर्चा झाली. यावेळी प्रशासनाकडून डॉक्टरांच्या मनधरणीचे झालेले प्रयत्नही निष्फळ ठरले. राज्य सरकारकडून लेखी आश्वासन न मिळाल्यानं मार्डच्या डॉक्टरांनी आजपासून संपाची हाक दिली आहे.  कोरोना काळातील फी माफी, कोविड प्रोत्साहन भत्ता, हॉस्टेल समस्या, पालिकेतील निवासी डॉक्टरांचा टीडीएस अशा विविध मुद्द्यांवर फक्त आश्वासनं मिळाली पण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून मार्डचे डॉक्टर संपावर गेले आहेत. संपादरम्यान कोरोनाबाधितांच्या उपचारात खंड पडणार नाही, असं संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 


डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी आठवड्याभरात विशेष विभाग कार्यान्वित होणार, राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती


राज्यव्यापी मार्ड डॉक्टरांच्या संपाबद्दलची बैठक निष्फळ


सेंट जॉर्ज रुग्णालयात प्रशासन आणि निवासी डॉक्टरांची 2-3 तास चर्चा झाली. यावेळी प्रशासनाकडून डॉक्टरांच्या मनधरणीचे झालेले प्रयत्नही निष्फळ ठरले. डॉक्टरांना लेखी आश्वासन न दिल्यानं बैठक कोणत्याही निर्णयाविना ही बैठक झाली.  राज्य सरकारनं विविध मागण्यांची पूर्तता न केल्याने मार्डचा संपाचा निर्धार केला. कोरोना काळातील फी माफ करण्याची निवासी डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे.



काय आहेत मागण्या
राज्य सरकारने विविध मागण्यांची पूर्तता न केल्याने मार्डचा संपाचा निर्धार केला आहे.  कोरोना काळातील फी माफ करण्याची प्रमुख मागणी आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. या संपामुळं ओपीडीसह इतर रूग्णसेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 18 मेडिकल कॉलेजमधील सुमारे सव्वा पाच हजार निवासी डॉक्टर संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. रूग्णालयातील अत्यावश्यक सेवेतील आणि कोरोना वॉर्डमधील निवासी डॉक्टर मात्र संपात सहभागी न होता सेवेत कायम राहतील.


इतर महत्वाच्या बातम्या : 



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.