Education : परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्समध्ये महाराष्ट्र देशात प्रथम, शालेय शिक्षण सुविधेत अग्रगण्य
Maharashtra Education : महाराष्ट्रातील शाळांमध्ये भौतिक संसाधने आणि सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज) तसेच प्रशासकीय प्रक्रिया या गोष्टींमध्ये विकास झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
मुंबई: परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स (कार्यमान प्रतवारी निर्देशांक) 2020-21 मध्ये शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर राहिले आहेत. शालेय शिक्षणात भौतिक संसाधने आणि सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज) तसेच प्रशासकीय प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राची प्रगती यातून अधोरिखित झाली आहे.
शालेय शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची कामगिरी एकसमान प्रमाणात मोजण्यासाठी परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स दरवर्षी जाहीर केला जातो. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने 2017-18 ते 2019- 20 यादरम्यान तीन परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स अहवाल जाहीर केले आहेत.
पीजीआय संरचनेत एकूण 1000 पैकी गुण राज्यांना दिले जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने अध्यापन निष्पत्ती, प्रवेश, पायाभूत सुविधा, समता, प्रशासकीय प्रक्रिया या मुद्द्यांचा विचार करून हे गुण दिले जातात. या पीजीआय इंडेक्समध्ये महाराष्ट्राने 1000 पैकी 928 गुण मिळून महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
2019 च्या तुलनेत महाराष्ट्राची 59 गुणांनी वाढ झाली आहे. भौतिक संसाधने आणि सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज) व प्रशासकीय प्रक्रिया या गुणांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.
क्षेत्रनिहाय महाराष्ट्र राज्याच्या गुणांकाची तुलना 2019-20 आणि 2020-21
अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्ता (लर्निंग आऊटकमस कॉलिटी)
2020-21 गुण -144
2019-20 गुण- 144
एकूण गुणांची वाढ- बदल नाही
शाळा प्रवेश व निष्पत्ती (एक्सेस अँड आऊटकम्स)
2020-21 गुण -76
2019-20गुण -76
एकूण गुणांची वाढ- बदल नाही
भौतिक संसाधने व सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी)
2020-21 गुण -126
2019-20गुण 143
एकूण गुणांची वाढ- 17
समता (इक्विटी )
2020-21 गुण -224
2019-20गुण -225
एकूण गुणांची वाढ- 1
शासकीय प्रक्रिया ( गव्हर्नन्स प्रोसेस)
2020-21 गुण -299
2019-20गुण -240
एकूण गुणांची वाढ-41
क्षेत्रनिहाय महाराष्ट्राच्या गुणांकनाची तुलना पुढीलप्रमाणे
अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्ता श्रेणीमध्ये 2019-20 च्या 144 गुणांकनाच्या तुलनेत 2020-21 मध्ये कोणताही बदल नाही. शाळा प्रवेश व निष्पत्ती या श्रेणीमध्ये 2019-20 च्या 76 गुणांकनाच्या तुलनेत 2020-21 मध्ये बदल नाही. भौतिक संसाधने व सुविधा या श्रेणीमध्ये 2019-20 च्या 126 गुणांकनाच्या तुलनेत 2020-21 मध्ये 17 गुणांकनाची वाढ झाली असून ते 143 झाले आहे. समता या श्रेणीमध्ये 224 च्या तुलनेत एका गुणाची वाढ होऊन 2020-21 मध्ये 225 गुण झाले आहेत. तर, शासकीय प्रक्रिया या श्रेणीमध्ये 2019-20 च्या 299 गुणांच्या तुलनेत 41 गुणांची वाढ होऊन 2020-21 या वर्षी ते 340 झाले असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने अहवालात देण्यात आली आहे.