Maharashtra Rains Live Updates : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, काही ठिकाणी अतिवृष्टीचा मोठा फटका 

मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Jul 2022 02:21 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Rains Live Updates : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.  नदी नाल्यांना पूर आल्यामुळं हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला...More

Aurangabad: जायकवाडी धरणातून आणखी विसर्ग वाढवला

Aurangabad: जायकवाडी धरणातून सुरु असलेला विसर्ग टप्याटप्याने वाढवला जात आहे. कालपासून आतापर्यंत दोन वेळ विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाच्या एकूण 27  दरवाज्यांपैकी 10 ते 27  नंबरच्या एकूण 18 दरवाज्यातून दीड फुट उंचीवरून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे काही वेळापूर्वी पाण्याच्या विसर्गात 9 हजार 432 क्युसेकची वाढ केल्याने या 18 दरवाज्यातून 28 हजार 296 क्युसेकने पाणी विसर्ग सुरु आहे. तर जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेक आणि उजव्या कालव्यातून 550 क्युसेकने पाणी विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सर्व मिळून धरणातून एकुण 29 हजार 885 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.