एक्स्प्लोर

पावसाचा जोर कायम, मुंबई-कोकण, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : परतीच्या पावसानं महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यासह अनेक भागात होत असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रापासून कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात जाणारी वाहतूक बंद झाली आहे, तर शेकडो गावं संपर्काबाहेर गेली आहेत. बीड, लातूरमधील सगळे लघुप्रकल्पही तुडुंब झाले आहेत. मांजरा धरणाचा जलसाठा 5 दशलक्ष घनमीटरवर पोहचला असून अद्यापही पाण्याची आवक सुरुच आहे. लातूर-बिदर रोडवरील सर्वात मोठा असणारा पूलही पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या इशाऱ्यानं जनसामान्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण 30 सप्टेंबरपर्यंत कोकण, मराठवाडा आणि मुंबईत अतिवृष्टीची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसत आहे. मुंबईत अतिवृष्टीचा इशारा : मुंबईकरांनी पुढचे काही दिवस अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा आयएमडीनं दिला आहे. शुक्रवारी रात्रभर मायानगरीत पावसानं धुमाकूळ घातला. ठाण्यासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस आहे. दक्षिण मुंबईलाही अक्षरशः पावसानं झोडपून काढलं. हिंदमाता, परेलसह अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. सीएसटी परिरसात झाड कोसळल्यानं एक जण जखमी झाला, तर मुलुंडमध्येही भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी आहेत. कोकण रेल्वेवर परिणाम : गेल्या 24 तासांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला असताना आता या पावसाचा कोकण रेल्वेलाही फटका बसलेला पहायला मिळत आहे. चिपळूण आणि खेड दरम्यान मोठ्या प्रमाणात चिखल वाहून आल्याने कोकण रेल्वेवर परिणाम झाला आहे. गोव्याकडे जाणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस खवटी स्थानकात थांबवण्यात आली होती. रात्री उशिरा ती मार्गस्थ झाली. आरवली बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आहे. त्यामुळे रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी, राज्यराणी, कोकणकन्या आणि मत्स्यगंधा या गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्या उशिराने रवाना झाल्या. आजही पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या खात्याचा मोठा प्रहार; अकोल्यात गुटख्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुटखा माफियांचे धाबे दणाणले
तुकाराम मुंढेंच्या खात्याचा मोठा प्रहार; अकोल्यात गुटख्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुटखा माफियांचे धाबे दणाणले
Jejuri Warkari Accident Deaths : जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली
जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली
Sunil Tatkare On NCP Politics: आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही- सुनील तटकरे
आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही- सुनील तटकरे
Latur Crime News: 11 वाजता घरातून बाहेर पडले, फोन उचलला नाही म्हणून पत्नीने मोबाईल लोकेशन ट्रॅक केलं अन्...; लातूरच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञाच्या मृत्यूने खळबळ, नेमकं काय घडलं?
11 वाजता घरातून बाहेर पडले, फोन उचलला नाही म्हणून पत्नीने मोबाईल लोकेशन ट्रॅक केलं अन्...; लातूरच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञाच्या मृत्यूने खळबळ, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget