एक्स्प्लोर

सावधान! 5 ते 10 जुलै राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या भागात कसा असणार पाऊस? 

जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जुलै (उद्यापासून) ते 10 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे.

Maharashtra Rain Update News : सध्या मान्सूनने (Monsoon) देश काबिज केला आहे. त्यामुळं देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. कुठं कमी तर कुठं जास्त प्रमाणात पाऊस हजेरी लावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात (Maharashtra) देखील तशीच स्थिती आहे. दरम्यान, जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जुलै (उद्यापासून) ते 10 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे. या काळात पावसाची तीव्रती अधिक असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. 

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातही मराठवाडा वगळता उद्यापासून ( 5 जुलै) पुढील पाच दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत एमजेओ व मान्सुनच्या तसेच तटीय अशा दोन्हीही आसामुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे. गेल्या 10 दिवसापासून हलकासा का होईना पण होत असलेल्या डांगी पावसाचा जोर, नंदुरबार धुळे जळगांव जिल्ह्यात व पेठ सुरगाणा कळवण सटाणा मालेगांव देवळा तालुक्यात अजुनही कायम आहे. परंतु रविवार दिनांक 7 जुलैपासुन या डांगी पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी इतर प्रणल्यातून मध्यम पावसाची शक्यता ही टिकूनच असल्याचे खुळे म्हणाले.

'या' भागात जोरदार पावसाची शक्यता

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यात उद्या शुक्रवार दिनांक 5 जुलैपासून पुढील पाच दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले. 

मराठवाडा

मराठवाड्यात उद्यापासून 10 जुलैपर्यंतच्या पाच दिवसात मात्र जालना हिंगोली नांदेड परभणी धाराशिव लातूर  जिल्ह्यात मध्यम तर छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्यात किरकोळच पावसाचीच शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. 

कोकण व विदर्भ 

कोकणसह विदर्भात जोरदार पावसाचे सातत्य जरी टिकून असले तरी वातावरणीय प्रणल्याच्या प्रमाणात अपेक्षित अतिजोरदार पाऊस अलीकडे तिथे जाणवत नाही. विदर्भातही मध्यम पाऊस सध्या जाणवत आहे. येत्या पाच दिवसात ह्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.    तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती नागपूर भंडारा गोंदिया ह्या जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे. 
 
कोकणातून सह्याद्रीवर चढलेला मान्सूनची घाटमाथ्यावर सक्रियता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात आवक वाढून जल साठवण टक्केवारीच्या मापनास सुरवातही होवु शकते अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. 

 महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस कधी पडणार? 

विभागवार प्रणल्यातून चांगल्या पावसाची अपेक्षा असताना महाराष्ट्रात सध्या व्यापक जोरदार पाऊस न होता 27 जूनपासून भाग बदलतच मध्यम पाऊस होत आहे. काही जिल्ह्यात अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. पेरणी झालेल्या पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण जाणवत आहे. परंतू, आता देशाच्या मध्यावर स्थापित झालेला मुख्य मान्सूनी आस त्याच्या सरासरी जागेपासून अधिक दक्षिणेला जोपर्यंत सरकत नाही, तोपर्यंत नद्या खळखळून धरणात आवक वाढणार नाही. अर्थात ही शक्यता या जुलै महिन्यात घडून येऊ शकते असे माणिकराव खुळे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

जुलै महिन्यात पावसाची स्थिती कशी राहणार? कुठं कुठं पडणार पाऊस? सविस्तर माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 
बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…;झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर गिल संतापला
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9:00AM : 7 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPanvel Heavy Rain : पनवेलमध्ये मुसळधार पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरूपDeekshabhoomi Nagpur : अंडरग्राऊंड पार्किंगची जमीन पूर्ववत करण्याचा निर्णयBuldhana : चहा आणि सिगारेट दिली नाही म्हणून डाॅक्टरने महिलेला केलं विवस्त्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 
बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…;झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर गिल संतापला
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
Embed widget