सावधान! पुढील चार दिवस जालना जिल्ह्याला रेड अलर्ट जारी, काळजी घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जालना (Jalna) जिल्ह्याला पुढील चार तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं शेती पिकांचं (Agriculture Crop) मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर घरांचे देखील नुकसान झालं आहे. वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जालना (Jalna) जिल्ह्याला पुढील चार तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
पुढील चार ते पाच तास काळजी घ्या
पुढील चार ते पाच तास काळजी घ्यायची आहे, कुठे अनावश्यक कामासाठी जाऊ नका असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत आहे अशी माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळं शेती पिकांचं मोठं नुकसान
मराठवाड्यातील पूर परिस्थिती ओसरण्यास सुरुवात होताच पुन्हा एकदा बीड, धाराशिव, परभणी ,नांदेड, जालन्यासह लातूरमध्ये गेल्या 24 तासात पावसाने हाहाकार माजवला आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके कमरे एवढ्या पाण्यापर्यंत आली आहेत. सोयाबीन कापूस चिंब भिजले असून शेतकरी कर्जमाफी आणि सरसकट मदतीची मागणी करत आहेत. अनेक सखल भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून पुरामुळे आधीच भिजलेली पिके चारा मृत जनावरे यांच्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. (Flood)
आठवडाभरापासून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने कहर
गेल्या आठवडाभरापासून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे. धाराशिव बीड लातूर जिल्ह्यासह अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. नद्या नाल्यांना पाणी आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांना स्थलांतर करावं लागलं आहे.
























