एक्स्प्लोर

सावधान! राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात मोठा पाऊस झाल्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अशातच आता पुन्हा राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30 ते 40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40 ते50 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

मुंबईत कसं असणार हवामान?

पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तुरळक  ठिकाणी ढगाळ आकाशासह मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 25°C च्या आसपास असेल.
 
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. नदी नाले दुधतडी भरुन वाहत आहेत. दरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तसेच काही भागात जास्त पाऊस पडल्यामुळं शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आली आहे. यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. त्याच्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणी पेरणीपासून वंचित राहणार नाही. कारण की आतापर्यंत 350 मिलमीटर पाऊस झालेला आहे आणि याच्यानंतर 7, 8 जूनला देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 13 ते 17 चा देखील खूप पाऊस पडणार आहे‌.

महत्वाच्या बातम्या:

सावधान! राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, अतिवृष्टी होणार, नदी नाले वाहणार, जाणून घ्या पंजाबराव डखांचा हवामान अंदाज 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
Embed widget