Maharashtra Rain Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वदूर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Maharashtra Rain Live Update : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) कहर केला आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Apr 2023 11:51 PM
Jalna News: जालना: अवकाळी पावसाने वीज पडून 10 जनावरं दगावली

Jalna News:  जालना जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी आलेल्या पावसासोबत विजेच्या गडगडात जिल्ह्यात 10 जनावरं दगावलीत. अंबड तालुक्यात 8,  भोकरदन, बदनापूर तालुक्यात 2 जनावरे वीज कोसळून दगावली, हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट जारी केला होता, दुपारी अचानक आलेल्या पावसा सोबत वादळी वाऱ्याने फळपीक तसेच भाजीपाल्याचे देखील मोठे नुकसान झाल आहे.

Yavatmal News: सोसाट्याच्या वाऱ्यात अख्खा मंडप कोसळला ऐक लग्न मंडपात पावसाचे सावट

Yavatmal News:  यवतमाळच्या झरी तालुक्यातील मुकुटबन जवळीळ रुईकुट येथे बालाजी मोहितकार यांच्या मुलींच्या विवाह कार्यातच सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अशातच मंडप कोसळल्याने आलेल्या पाहुण्यांची दानादान उडाली.

APMC Election 2023 : त्र्यंबकेश्वरला बाजार समितीसाठी 85 टक्के मतदान, काहीवेळ अवकाळी पावसाची हजेरी

APMC Election 2023 : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणुकीत त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा परिषद शाळामध्ये मतदान झाले. सायंकाळी चार वाजेपर्यंत 85 टक्के मतदान झाले. निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असल्याने त्र्यंबक पोलिस यंत्रणा कमालीची दक्ष होती. दोन्ही पॅनलमध्ये मिळून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जवळपास बारा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच त्र्यंबकेश्वरला उप बाजार समिती होणार असल्याने प्रथमच बाजार समिती साठी मोठी चुरस त्र्यंबक तालुक्यात दिसून आली. तालुक्यातील हरसुल येथेही निवडणूक मतदानाला मोठा प्रतिसाद लाभला आहे. 

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा फटकाविद्यार्थ्यांना फटका, विद्यार्थी परीक्षेला तब्बल दोन तास उशीरा

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा फटका परीक्षार्थी विद्यार्थ्यांना   बसला आहे.   सीमावर्ती भागातील विद्यार्थी परीक्षेला तब्बल दोन तास उशीरा पोहचले. लातूर झहिराबाद रस्ता पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.  अवकाळीच्या तडाख्याने जमखंडीचा पूल पाण्याखाली गेला आहे.  BA, B.Com, BCA च्या अनेक परीक्षार्थी परीक्षेला उशीरा पोहोचले. परिस्थिती लक्षात  वेळ  वाढवून  देण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वदूर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाभरात सर्वदूर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच आज पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुपारनंतर सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील पैठण,सिल्लोड, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, कन्नड सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाला आहे. तर या भागात ठिकठिकाणी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय. तर छत्रपती संभाजी नगर शहरात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.


कुठं पडतोय पाऊस


छत्रपती संभाजीनगर शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात.


खुलताबाद शहर व ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटात व सुसाट वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू.


झोलेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात.


पैठण शहरात अवकाळी पाऊसाची बॅटिंग, वादळ वाऱ्या सह विजांचा कडकडाट पाहायला मिळतोय.


वैजापूर शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू असून, तालुक्यातील खंडाळा,लाडगावसह ठिकठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतोय.


बिडकीन गावात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.


पैठण एमआयडीसी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात. सोबतच वादळी वारा देखील पाहायला मिळतोय.


गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशनला जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय.


दौलताबाद परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.


पैठणच्या चित्तेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.

सांगोला तालुक्यात वादळी पाऊस, वावटळीत दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

Sangola Rain :  सांगोला तालुक्यात जोरदार वादळी पाऊस झाला. वावटळीत दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची  घटना घडली आहे. झोळी उडाल्यानं चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. जवळा येथील लेंडी ओढ्यातील दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास जवळा येथील लेंडी ओढ्यात ही दुर्घटना घडली. कस्तुरा साधू चव्हाण (रा. सोनंद ता. सांगोला)  असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेनंतर कुटुंबार शोककळा पसरली आहे. (वाचा सविस्तर) 

Rain News : शिर्डी आणि राहाता परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Rain News : शिर्डी आणि राहाता परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसला सुरुवात झाली आहे. सकाळी वातावरण स्वच्छ असताना अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि काही क्षणातच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यात वीज कोसळून बैलजोडी आणि एक गाय दगावली





Hingoli Rain : हिंगोलीत काल रात्री अवकाळी झालेल्या अवकाळी पावसानं पुन्हा एकदा हैदोस घातला आहे. सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे रात्री झालेल्या वादळी वाऱ्यात राजेश दळवी यांच्या शेतातील आखाड्यावर वीज कोसळून शेतकऱ्याची बैलजोडी आणि एक गाय दगावली आहे. सुदैवाने यात काही अंतरावरच बांधलेली इतर जनावरे मात्र सुरक्षित राहिली आहेत. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.


 

 



 


Ahmednagar Rain : अहमदनगर शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Ahmednagar Rain : अहमदनगर शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळं बाजार समितीच्या निवडणूक मतदानासाठी आलेल्या मतदार आणि नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाल. अचानक आलेल्या पावसामुळं जागा मिळेल मिळेल तिथे उमेदवार आणि कार्यकर्ते आडोसा शोधत होते. शहरातील आनंद विद्यालय येथील मतदान केंद्राबाहेर सकाळपासूनच तणाव पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उभे राहत असल्यानं वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Amravati Rain : अमरावतीत जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका, आंबा, कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान.

Amravati Rain : अमरावती जिल्ह्यात काल सायंकाळी पुन्हा वादळी वारा पाऊस झाला. अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मोठा तडाखा शेती पिकांना बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील संत्रा बागांना गारपीटचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळं आणि गारपीटमुळं आंबिया बहारातील संत्रा गळला. पावसामुळे आंबा, कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान. वरुड तालुक्यातील कुंड नदीला काल पूर आला होता. 

पावसामुळं लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्ग बंद, जमखंडी पुलावर पावसाचं पाणी

Latur Rain : मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा अक्षरशः कहर होता. लातूर जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी होती. कर्नाटक महाराष्ट्र सीमावरती भागातील औराद शहाजानी जवळील जमखंडी येथील पुलावरुन पावसाचे पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. लातूर जहीराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील जमखंडी येथे नवीन उभारण्यात येत असल्यानं पर्यायी फुलाची व्यवस्था करण्यात आली होती. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत झालेल्या तुफान पावसामुळं या ठिकाणी पुलावरुन पाणी वाहत आहे. यामुळं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या भागामध्ये मध्यरात्रीपासून सुरु झालेला पाऊस अद्यापही सुरूच असल्याची माहिती आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Update : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) कहर केला आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामुळं शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यातील विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.


लातूरमध्ये अवकाळी पावसाचा कहर 


लातूर (Latur) जिल्ह्यातही रात्रीपासूनच तुफान अवकाळी पाऊस सुरु आहे. मध्यरात्रीपासून सुरु झालेला पाऊस सकाळपर्यंत सुरुच होता. या पावसानं सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.  मागील दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं सातत्याने हजेरी लावली आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळं शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पावसाबरोबरच जोरदार वारा आणि विजेचा गडगडाही सुरु होता. या वादळी वाऱ्यामुळं अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. मागील महिनाभरात अनेक वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्याचे अर्थकारण मोडून पडलं आहे. त्यात आता पुन्हा मागील दोन ते तीन दिवसापासून सतत अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. 


लातूर जिल्ह्यात वीज पडून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू, तर अनेक ठिकाणी जनावरांचांही मृत्यू


लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी जनावरांचं मृत्यू झालं आहे. तर वीज कोसळून एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना देखील समोर आली आहे. आरुषा नथुराम राठोड (वय 11 वर्ष, रा. मुबारकपूर तांडा, ता. निलंगा) असे मृत मुलीचे नाव आहे. आरुषा नथुराम राठोड ही मुलगी शेतात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेलेली होती. मात्र, अचानक तिच्या अंगावर वीज कोसळल्यानं तिचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच निलंगा तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 


हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस 


हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. हिंगोली शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. 
या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पिकांचे सतत नुकसान होत आहे. पपई, आंबे यासह हळद, भुईमूग, उन्हाळी कांदा, उन्हाळी सोयाबीन, ज्वारी या पिकांचे या अवकळी पावसानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. 


Amravati Rain : अमरावती जिल्ह्यात वादळी पाऊस 


अमरावती जिल्ह्यात वादळी पाऊस वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तसेच अनेक ठिकाणी  जोरदार गारपीट देखील झाली आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळं जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.