मुंबई : सरकारी नोकरीसाठी (JOB) तरुणाई सातत्याने प्रयत्न करत असते, पण सरकारी विभागातही आता मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती होत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागांतर्गतही कर्मचारी व विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते. राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आदर्श आचारसंहिता देखील शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे, आता भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर, राज्य मार्ग परिवहन विभागाच्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात 208 शिकाऊ उमेदवारांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यात 75 मोटर मेकॅनिक, 30 शिटमेटल, 34 डिझेल मेकॅनिक, 30 मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक, 20 वेल्डर, 12 रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कंडिशनर रिपेअर, 2 टर्नर, 5 पेंटर जनरल या पदांचा समावेश आहे. या जाहिरातीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना राज्य परिवहनमध्ये सामावून घेण्याबाबत कोणताही विचार केला जाणार नाही किंवा महामंडळावर घेतले जाईल, तसे कुठलंही बंधन असहणार नाही, असे जाहिरातीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ  अंतर्गत शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष) पदांच्या एकूण 208 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख  13 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे, इच्छुक व शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांनी लगेचच अर्ज करुन भरतीसाठी प्रयत्न करावेत. 

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष)

पदसंख्या – 208 जागाशैक्षणिक पात्रता –10th Passवयोमर्यादा – 18 – 33 वर्षेनोकरी ठिकाण – यवतमाळ

Continues below advertisement

अर्ज शुल्क  

इतर सर्व उमेदवार –  रु. 590/-SC/ST/PwBD उमेदवार – रु. 295/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  13 डिसेंबर 2024अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in

हेही वाचा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; तारीख 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित