Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोनेतारण कर्जाची संख्या गेल्या सात महिन्यात 50.4 टक्क्यांनी वाढली असल्याचं आरबीआयच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. इतर कर्जांच्या तुलनेत सोने तारण कर्जात वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरबीआयनं शुक्रवारी जारी केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार सोने तारण कर्जाची रक्कम 1 54282 कोटींवर गेली आहे. मार्च महिन्यात ही रक्कम 102562 कोटींवर होतं.
बँकर्सनी पहिल्या सात महिन्यात सोने तारण कर्ज वाढण्यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एनबीएफसीकडून ग्राहक पुन्हा एकदा एकदा बँकेच्या कर्जाकडे वळला असल्याचं निरीक्षण नोंदवलं.
एनबीएफसीच्या तुलनेत सोने तारण कर्जावर कमी व्याज लागतं. याशिवाय दुसऱ्या कर्जांची परतफेड करण्यासाठी देखील सोने तारण कर्ज काढली जात असावीत, अशी शक्यता व्यक्त केली.
याशिवाय गृहकर्जाच्या प्रमाणामध्ये देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.