Maharashtra Rain LIVE Update : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस, वाचा पावसासंबंधी प्रत्येक अपडेट

Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jul 2021 09:33 AM
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाला वेग

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाला वेग, 


सुखनदी, निर्मला, तिलारी, तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे,


वाघोटन नदी इशारा पातळीजवळ किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा,


जिल्ह्यात १३ ते १६ जुलै पर्यत ऑरेंज अलर्ट असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाने निर्देश

मुसळधार पावसामुळे बिदर -नांदेड राज्य महामार्गावरील निर्माणाधीन पूल गेला वाहून

नांदेड :  कंधार तालुक्यातील फुलवळ येथील बिदर-नांदेड राज्य महामार्गावरील पुलाचे काम सुरू होते .कालच्या अचानक सुरू झालेल्या ढग फुटी सदृश्य मुसळधार पावसाच्या पाण्याने निर्माणाधीन पुल व पुलाच्या कामावरील सर्व साहित्य वाहून गेलंय, तर यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीय.

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सहस्रकुंडचा धबधबा दुसऱ्यांदा झाला प्रवाहित

मराठवाड्यात सीमेवरून वाहणारा पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा काल पासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे यावर्षी दुसऱ्यांदा ओसंडून प्रवाहित झालाय. नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने सळसळ करत वाहू लागला आहे. हि बातमी समजताच पर्यटकांनि सहस्रकुंडची वाट धरली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे पर्यटकांना या ठिकाणी जात आले नव्हते यंदा मात्र नांदेड जिल्हा अनलॉक झाल्याने पर्यटक सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यास जात आहेत.  

रस्त्यावरून पाणी वाहत असताना एसटी चालकाने बस पाण्यातून काढली

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे . त्यातच रविवारी दिवसभर रायगड जिल्ह्यातील मुरूड , श्रीवर्धन, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर भागात पावसाने धुवादार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. याचदरम्यान, महाड तालुक्यातील विन्हेरे गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील रेवतळे फाटा येथील रस्त्यावरून पाणी वाहत असताना एसटी चालकाने बस पाण्यातून मार्ग काढत नेली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रेवतळे नजीकच्या या मार्गावर पाण्याचा मोठा प्रवाह वाहताना दिसत असून एसटी चालकाने केलेल्या या अतिउत्साहामुळे प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, केवळ सुदैवाने ही एसटी बस रस्त्याच्या पलीकडे गेल्याचे दिसत आहे. 

गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 139.57 मिमी पावसाची नोंद

रायगड : गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 139.57 मिमी पावसाची नोंद....  तळा येथे सर्वाधिक 239, मुरूड 204, माणगाव 197, माथेरान 175.40 मिमी पावसाची नोंद, पोलादपूर येथे 168 , सुधागड 150 , रोहा 150 मिमी पावसाची नोंद...

कल्याण डोंबिवलीमध्ये आज पावसाला सुरवात

काही दिवसांच्या विश्रातीनंतर आज दुपारनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये आज पावसाला सुरवात झाली आहे . सकाळी  कडक ऊन पडल्यानंतर दुपारनंतर रिमझिम पाऊस सुरु झाला होता .तर रात्रीच्या सुमारास अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्यामुळे वातावरण काहीसा गारवा निर्माण झालाय .त्यामुळे उकड्या ने हैराण झालेल्या नागरिकाना दिलसा मिळालाय

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी खारेपाटण मधील सुखनदीला तर कुडाळ मधील निर्मला नदीला पूर आला आहे. रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील तीन ते चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सकल भागात पाणी साचल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे.  दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील अनेक काजवे पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 147.30 मि.मी. पावसाची नोंद तर आतापर्यंत एकूण सरासरी 1471.21 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर दुपारी भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी

दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने दुपारी भिवंडी शहरासह ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात प्रचंड उकाडा होत असल्याने नागरिक देखील हैराण झाले होते मात्र पावसाने आता हजेरी लावल्यानंतर या उकाड्यापासून सुटका मिळाली आहे . तर पाऊस होत नसल्याने बळीराजा देखील चिंतेत पडला होता परंतु  या पावसामुळे बळीराजाची आनंदीत झालाय

परभणीतील गोदावरीवरील तीनही बंधारे ओव्हरफ्लो

परभणी जिल्ह्यात काल झालेल्या सर्वदूर पावसाने यंदा जुलै दुसऱ्या आठवड्यातच गोदावरी वरील तिन्ही उच्च पातळी बंधारे ओव्हरफ्लो झाले आहे.पाथरी तील ढालेगाव बंधाऱ्याच्या दोन,तारूगव्हाण बंधाऱ्याचे २ तसेच मुद्गल बंधाऱ्याच्या एका दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला आहे.त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने गोदावरी काठच्या गावाना सतर्कतेचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे...

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात पुरानं दुकानं आणि बाजारपेठेतील घरं पाण्याखाली

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात पुरानं दुकानं आणि बाजारपेठेतील घरं पाण्याखाली गेली आहेत. रात्रभर जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकात सध्या 10 ते 15 फुट इतकं पाणी आहे. स्थानिक स्वयंसेवक आणि नगरसेवकांनी इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. दरम्यान, अर्जुना आणि कोदवली नदीला आलेल्या पुरामुळे बाजारपेठेतील पाणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन दिघी मार्गावर दरड कोसळली

रायगड .. 


श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन दिघी मार्गावर दरड कोसळली... 


कुडगाव गावाजवळ कोसळली दरड, रस्ता खचला.... 


कुडगाव जवळ रस्ता खचल्याने एकेरी वाहतूक सुरू

परभणीच्या शिर्सी बुद्रुक गावातील 10   मेंढपाळांच्या 233 मेंढ्या ओढ्याच्या पाण्यात वाहून जात दगवल्या

परभणी जिल्ह्यात मागच्या 24 तासात तब्बल 232 मिमी पावसाची नोंद झालीय त्यामुळे अनेक ठिकाणी शेती,घर,दुकान आदींचे नुकसान झाले आहे.सगळ्यात जास्त नुकसान हे परभणी तालुक्यातील शिर्सी बुद्रुक येथे झाले आहे.पावसाच्या पाण्याने गावाच्या ओढ्याला पूर आला आणि याच पुरात 10 मेंढपाळांच्या तब्बल 233 मेंढ्या वाहून जात दगावल्या आहेत.त्यामुळे या मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे

सिंधुदुर्ग  जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू

सिंधुदुर्ग  जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू, रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे  सकल भागात पाणी साचलं , जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, तिलारी, सुखनदी, निर्मला नदीला पूरस्थिती, 


सकल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

कणकवलीतील खारेपाटण मध्ये पुरजन्य परिस्थिती, शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खारेपाटण गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली काही दिवस पावसाने दडी मारल्यानंतर रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली असून नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर चिंताग्रस्त असलेला कोकणातील शेतकरी या पावसामुळे काहीसा सुखावला असून शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर घेतला आहे. 
          
खारेपाटण येथे पूरपरिस्थिती मुळे शुक नदीपात्राचे पाणी खारेपाटण शहरात घुसले असून यामुळे खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे पुराचे पाणी आले असून खारेपाटण बाजारपेठ मधून बंदरवाडी व सम्यकनगर कडे जाणार रस्ता पुराच्या पाण्याच्या खाली गेला आहे. त्यामुळे येथील लोकवस्तीचा संपर्क तुटला आहे. तर खारेपाटण मासळी मार्केट इमारतीला पुराच्या पाण्याने वेढले आहे. याचबरोबर खारेपाटण बाजारपेठेतून कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला असून येथील वाहतूक बंद आहे. खारेपाटण मधील बिगे व भाटले येथील शेती पाण्याखाली गेली असून सुमारे ५ फूट पेक्षा अधिक पाणी शेत पिकात घुसले उभे पीक पाण्याखाली गेले आहे. खारेपाटण चिंचवली मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील वावलोटी आणि सुपेगाव हे दोन्ही गावात पाणी शिरले.. 

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील वावलोटी आणि सुपेगाव हे दोन्ही गावात पाणी शिरले.. 


वावटोली आणि सुपेगाव गावातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण..  


कुंडलिका रिव्हर्सची रेस्क्यू टीम मुरुडकडे रवाना... 


मुरुड - आगरदांडा रस्तेमार्गावर पाणी साचल्याने रस्ता पाण्याखाली गेला आहे... 


मुरुड तालुक्यात गेल्या २४ तासात ३४८ मिमी पावसाची नोंद ...

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहराला पाण्याचा धोका

पावसाचा जोर वाढत आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहराला पाण्याचा धोका देखील वाढत आहे. सध्या या ठिकाणीहून व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला असून नागरिकांना देखील इशारा देण्यात आला आहे. रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसानं जिल्ह्यात जोरदार बॅटिंग सुरू केल्यानं राजापूर शहरा जवळून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली या नद्यांना पूर आला आहे. पावसाच्या वाढत्या जोरासोबतच या नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ होत आहे. दरम्यान, या नद्यांना आलेल्या पुराचा आणि पाण्याचा अंदाज घेत ब्रिटीशकालीन पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई - गोवा हायवेवरील वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. 

रायगड जिल्ह्यातील मुरूड, श्रीवर्धन, माथेरान, तळा भागात जोरदार पावसाची हजेरी

रायगड : रायगड जिल्ह्यातील मुरूड, श्रीवर्धन, माथेरान, तळा भागात जोरदार पावसाची हजेरी, रात्रीच्या सुमारास पावसाची जोरदार हजेरी... 


श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन एसटी स्टॅंडच्या पुढे पुलाजवळ पाणी साचले..


रोहा मुरूड मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प,  कवळटे आदिवासी वाडी केलघर मार्गावर दरड कोसळली..


दरडीमुळे माती- दगड रस्त्यावर आल्याने केलघर मुरुड मार्गावरील वाहतूक ठप्प... 


मुरूड येथे सर्वाधिक ३४८ मिमी, श्रीवर्धन २१०मिमी, माथेरान २१४ मिमी, तळा १३१ मिमी पावसाची नोंद ...


रायगड जिल्ह्यात सरासरी ८०.७६ मिमी पावसाची नोंद..

पाथरी-परभणी राष्ट्रीय महामार्ग 61 बंद, किन्होळा पाटीवरील लिंबोटीचा पुल वाहून गेला

परभणी जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणचे रस्ते अजूनही बंद आहेत.काल रात्री पाथरी-परभणी राष्ट्रीय महामार्ग 61 च्या किन्होळा पाटीवरील लिंबोटी पुल कालच्या पावसात वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय.त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा दोन्ही बाजूने लागल्या असुन ज्यांना पाथरी,उमरी मार्ग माहिती आहे ते वाहन चालक या पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत.प्रशासनाकडून हा रस्ता सुरू करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे मात्र त्यालाही 3-4 तास लागणार असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णच ठप्प झालीय.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे प्रमुख नद्यांसह गाव खेड्यातील नदी आणि ओहळ यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सद्यस्थितीत तरी पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये पावसाचा जोर चांगलाच असल्याचं चित्र सध्या आहे. वातावरण आणि हवामान विभागाचा अंदाज पाहता हा जोर वाढण्याची देखील शक्यता आहे. 

राजापूर शहरातील जवाहर चौकात पाणी भरलं

 रत्नागिरी जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकात पाणी भरलं आहे, साधारण तीन फुटापर्यंत हे पाणी असण्याची शक्यता आहे. राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेनं देखील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.  

ओढ्याच्या पुरात आईसह मुलगा गेला वाहून, हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील घटना 

हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात ओढ्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने एका महिलेसह त्यांचा मुलगा वाहून गेल्याची घटना काल रात्री घडली असुन पती आणि चालक या घटनेत बचावले आहेत..रात्रभर शोधकार्य सुरू होते मात्र आई आणि मुलगा दोघांचेही मृतदेह मात्र अद्याप सापडले नाहीत.. औंढा नागनाथ तालुक्यातील शेळके पोटा येथील रामदास शेळके,वर्षा योगेश पडोळ,योगेश पडोळ व मुलगा श्रेयश पडोळ हे चार जण कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम आटोपून ते कोंडसी असोला मार्गे औरंगाबादला निघाले.यावेळी चालक योगेशला ओढ्याला आलेल्या पाण्याचा आंदाज आला नाही.त्यांनी गाडी काढण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी गेली नाही आणि इथेच योगेश पडोळ,वर्षा पडोळ,श्रेयश पडोळ हा सात वर्षाचा मुलगा तिघे उतरले पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे तिघेही पाण्यात वाहून गेले.रामदास शेळके,चालक योगेश यांना बाहेर काढण्यात यश आले.दरम्यान,तहसीलदार कृष्णा कानगुले,सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे वाहून गेलेल्या आई आणि सात वर्षाच्या मुलाचा शोध घेत आहेत रात्री उशीरापर्यंत हे शोधकार्य सुरूच होते सकाळी पुन्हा हे शोधकार्य सुरू करण्यात आले मात्र अद्याप आई आणि मुलगा यांचा मृतदेह मात्र सापडला नाही...

मुरुड आणि रोहा तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

रायगड :  मुरुड आणि रोहा तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी, रात्रभर पावसाची संततधार सुरू...  मुरुड आगरदांडा रस्ता पाण्याखाली, पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले,  मुरुड बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी,  आज सकाळपासून पावसाची संततधार ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पावसामुळं जिल्ह्यातील नद्याच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्गमध्ये मुसळधार तर देवगड, वैभववाडीत संततधार पाऊस सुरू आहे. रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.  पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी 1323.91 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस

गेल्या महिनाभर दडी मारलेल्या पावसाने कालपासून नांदेड शहरासह जिल्हाभरात दमदार हजेरी लावलीय. काल दुपारनंतर  झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड शहर मात्र जलमय झालेय.नांदेड शहरातील भाग्यनगर, आनंद नगर, तरोडा नाका, भावसारचौक ,महावीर चौक ,वाजीराबाद चौकातील सखल भागात पाणी साचून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शहर तुंबल्याची स्थिती निर्माण झालीय. नांदेड शहरातील ड्रेनेज व नाल्यांचे पाणी रस्त्यावर येऊन शहरातील सर्व रस्ते मात्र जलमय झालेत. परंतु पहिल्याच पावसात शहरातील रस्ते तुंबल्यामुळे नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या नाले सफाई मोहिमेचे मात्र पितळ उघडे झालेय. या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील तरोडा नाका, गोकुळ नगर, लेबर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. महापालिकेने मान्सूनपूर्व नाले सफाईच्या कामात केलेला ढिसाळपणा यामुळे मात्र उघड झालाय. 

बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी..

पावसाळ्याच्या तोंडावर धो-धो बरसणाऱ्या पावसाने पेरणीनंतर उघडीप दिली होती. त्यामुळे बीड जिल्ह्यातील काही भागात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मात्र मागच्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काल दुपारपासून बीड जिल्ह्यात पुन्हा दमदार पावसाने सुरुवात केली आहे. बीड शहरामध्ये मध्यम स्वरूपाचा तर अंबाजोगाई तालुक्यात परळी आणि माजलगाव परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

परभणी शहर आणि परिसरात 15 वर्षानंतर सर्वाधिक पावसाची नोंद

परभणी शहर आणि परिसरात तब्बल 232 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागात या पावसाची नोंद कऱण्यात आली आहे. 2005 आणि 2006 नंतर 15 वर्षानंतर एवढा पाऊस पडला असल्याचं सांगण्यात आलंय. 24 तासात 232 मिमी पाऊस पडण्याची आजपर्यंतची तिसरी वेळ आहे. 2005 साली 242 मिमी,2006 साली 234 मिमी तर 2021 साली म्हणजे यंदा 232 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कालच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक रस्ते अजुनही बंदच आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार

काल रात्री उशीरापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार झाली. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.  सतत चार तासाच्या पावसाने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. उस्मानाबादेत नव्याने तयार करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.  बसवेश्वर चौक ते जिजाऊ चौकादरम्यानच्या अर्धवट काम असणाऱ्या पुलांवर पाणी साठले होते. बसस्थानक परिसर तसेच संजीवन हॉस्पिटल जवळ पाणी साचल्याने वाहनधारकांना मार्ग काढताना कसरत करावी लागली. ग्रामीण भागापेक्षा शहर आणि परिसरात पावसाचा जोर होता. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यात सर्वत्र पावसाची हजेरी

मागच्या 24 तासात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय.परभणी,नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय, उस्मानाबादमध्ये ही जोरदार पाऊस झालाय तर बीड,लातूर,औरंगाबादमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. ज्यामुळे अनेक पिकांना मात्र जीवदान मिळाले असले तरी नांदेड आणि परभणी शहराची अवस्था मात्र फार वाईट झाली होती. सतत पडत असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि सखल भागात पाणीच पाणी झाले होते.परभणीत भीम नगर,क्रांती नगर,इंदिरा गांधी नगर,रामकृष्ण नगर मधील काही घरात पाणी शिरले तर रेल्वेस्थानक, बस स्थानक पूर्ण पाण्यात गेले होते.नांदेडमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळालीय.

पार्श्वभूमी


Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानं पेरणी झाल्यानंतर आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याचा अंदाज  हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.   




मराठवाड्यात सर्वत्र पावसाची हजेरी
मागच्या 24 तासात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय.परभणी,नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय, उस्मानाबादमध्ये ही जोरदार पाऊस झालाय तर बीड,लातूर,औरंगाबादमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. ज्यामुळे अनेक पिकांना मात्र जीवदान मिळाले असले तरी नांदेड आणि परभणी शहराची अवस्था मात्र फार वाईट झाली होती. सतत पडत असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि सखल भागात पाणीच पाणी झाले होते.परभणीत भीम नगर,क्रांती नगर,इंदिरा गांधी नगर,रामकृष्ण नगर मधील काही घरात पाणी शिरले तर रेल्वेस्थानक, बस स्थानक पूर्ण पाण्यात गेले होते.नांदेडमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळालीय.




Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील दोन दिवस सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज, विभागवार अंदाज जाणून घ्या...









 




उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार
काल रात्री उशीरापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार झाली. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.  सतत चार तासाच्या पावसाने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. उस्मानाबादेत नव्याने तयार करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.  बसवेश्वर चौक ते जिजाऊ चौकादरम्यानच्या अर्धवट काम असणाऱ्या पुलांवर पाणी साठले होते. बसस्थानक परिसर तसेच संजीवन हॉस्पिटल जवळ पाणी साचल्याने वाहनधारकांना मार्ग काढताना कसरत करावी लागली. ग्रामीण भागापेक्षा शहर आणि परिसरात पावसाचा जोर होता. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.




बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी..




पावसाळ्याच्या तोंडावर धो-धो बरसणाऱ्या पावसाने पेरणीनंतर उघडीप दिली होती. त्यामुळे बीड जिल्ह्यातील काही भागात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मात्र मागच्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काल दुपारपासून बीड जिल्ह्यात पुन्हा दमदार पावसाने सुरुवात केली आहे. बीड शहरामध्ये मध्यम स्वरूपाचा तर अंबाजोगाई तालुक्यात परळी आणि माजलगाव परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे




नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस
गेल्या महिनाभर दडी मारलेल्या पावसाने कालपासून नांदेड शहरासह जिल्हाभरात दमदार हजेरी लावलीय. काल दुपारनंतर  झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड शहर मात्र जलमय झालेय.नांदेड शहरातील भाग्यनगर, आनंद नगर, तरोडा नाका, भावसारचौक ,महावीर चौक ,वाजीराबाद चौकातील सखल भागात पाणी साचून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शहर तुंबल्याची स्थिती निर्माण झालीय. नांदेड शहरातील ड्रेनेज व नाल्यांचे पाणी रस्त्यावर येऊन शहरातील सर्व रस्ते मात्र जलमय झालेत. परंतु पहिल्याच पावसात शहरातील रस्ते तुंबल्यामुळे नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या नाले सफाई मोहिमेचे मात्र पितळ उघडे झालेय. या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील तरोडा नाका, गोकुळ नगर, लेबर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. महापालिकेने मान्सूनपूर्व नाले सफाईच्या कामात केलेला ढिसाळपणा यामुळे मात्र उघड झालाय. 




सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू




सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पावसामुळं जिल्ह्यातील नद्याच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्गमध्ये मुसळधार तर देवगड, वैभववाडीत संततधार पाऊस सुरू आहे. रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.  पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी 1323.91 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 




रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर पाऊस 




रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर चांगलाच पाऊस बरसत आहे. सद्यस्थितीत पावसानं जिल्ह्याच्या दक्षिण भागात काहीशी उसंत घेतली आहे. पण, उत्तर भागात मात्र पावसाच्या सरी बरसत आहेत. दरम्यान, मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं संगमेश्वरमधील माखजन बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. बावनदी, सोनवी आणि शास्त्री या नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. पुढील 2 दिवस दक्षिण कोकणात अर्थात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील चांगलाच पाऊस बरसत असून नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ होत आहे. अशीच स्थिती पावसाची कायम राहिल्यास नद्यांना पुराची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, जवळपास 10 दिवसानंतर पावसाचं आगमन झाल्यानं बळीराजा मात्र सुखावला असून शेतीची कामं उरकण्याकडे त्याचा कल दिसून येत आहे. 




बुलढाणा : जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे.  त्यामुळे पूर्णा नदीची पातळी वाढली असून सातत्याने नदीच्या पातळीत वाढ होत आहे. रात्री तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी मात्र सुखावला आहे.




अकोला: जिल्ह्यात काल रात्रीपर्यंत मुसळधार पावसानं सर्वच तालुक्यांत पूर परिस्थिती होती. 10 जुलैच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. यामुळे जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या काटेपुर्णा नदीसह पठार, मन, बोर्डी नदीला पूर आले होते. अकोला आणि अकोटला जोडणाऱ्या गांधीग्राम येथील पुलापर्यंत पुराचे पाणी आले होते. आता मात्र, पाणी पातळी कमी झाल्याने अकोला- अकोट मार्ग बंद पडण्याची परिस्थिती तुर्तास टळलीय. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुरामूळे शेतं खरडून गेली आहे. या सर्वदुर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील रखडलेल्या पेरणीच्या कामांना मात्र वेग आलाय. 





 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.