एक्स्प्लोर

Rahul Gandhi : राहुल गांधी यापुढं सावरकरांवर टीका करणार नाहीत, ठाकरेंच्या दबावामुळं घेतला निर्णय; सूत्रांची एबीपी माझाला माहिती

Rahul Gandhi : विरोधी पक्षांच्या बैठकीत राहुल गांधींनी आता सावरकरांवर बोलणार नसल्याचे संकेत दिल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.

Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळं चांगलच वातावरण तापलं आहे. यावरुन शिवसेना (shivsena) ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नसल्याचे शिवसेनेच्या ठाकरे गटानं म्हटलं आहे. दरम्यान, काल (27 मार्च) दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीपासून दूर राहून शिवसेनेनं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत राहुल गांधींनी आता सावरकरांवर वादग्रस्त बोलणार नसल्याचे संकेत दिल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.

भाजपचा सामना करायचा असेल तर आपसात मतभेद असून चालणार नाहीत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेलं वक्तव्य आणि त्यावर शिवसेनेच्या भूमिकेचा उल्लेख केला होता. भाजपला दूर करायचे असेल तर विरोधी पक्षांमध्ये फूट पडायला नको ही भूमिका कालच्या बैठकीत घेण्यात आली. सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळं राज्यात महाविकास आघाडीत फूट पडेल का? अशा प्रकारची चर्चा देखील सुरु झाली होती. पण यापुढे राहुल गांधी सावरकर यांच्यावर वादग्रस्त बोलणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, शरद पवारांनी काल मांडलेल्या सावरकर यांच्याबाबतच्या मुद्द्याला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला. शेवटी राहुल गांधींनाही ते पटलं. आपल्याला भाजपचा सामना करायचा असेल तर आपसात मतभेद असून चालणार नाही, असं राहुल म्हणाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शिवसेनेचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न 

अदानी प्रकरण आणि राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याचाय मुद्यावरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 18 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काल रात्री बैठक झाली. या बैठकीत सर्व पक्षांनी भाजपविरोधी एकत्र येऊन कसं लढता येईल तसेच रणनिती काय असावी यावर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यामुळं या बैठकीला हजेरी न लावता शिवसेनेने एका प्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

महत्त्वाच्या बातम्या:

Rahul Gandhi :  पंतप्रधान मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती, म्हणून माझी खासदारकी रद्द केली : राहुल गांधी

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Babanrao Taywade : राज्यातील ओबीसी विद्यार्थी मोठ्या अडचणीत, 72 वसतीगृहांची प्रवेशप्रक्रिया रखडली, बबनराव तायवाडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार
राज्यातील ओबीसी विद्यार्थी मोठ्या अडचणीत, 72 वसतीगृहांची प्रवेशप्रक्रिया रखडली, बबनराव तायवाडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता, एकाचवेळी महानगरपालिकेच्या 23 नगरसेवकांचं पद जाणार? भाजपच्या 7 नगरसेवकांवर टांगती तलवार
छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता, एकाचवेळी महानगरपालिकेच्या 23 नगरसेवकांचं पद जाणार? भाजपच्या 7 नगरसेवकांवर टांगती तलवार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget