एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली; विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी घेणार एमपीएससी
राज्य सरकारचा आदेश पाळायचा की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अशा द्विधा मनस्थितीत उमेदवार आहेत. म्हणूनच ही चाचणी रद्द करावी अशी मागणी उमेदवार सरकारकडे करत आहेत.
पिपरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात घेण्यात येणाऱ्या परीक्षांना 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्याच्या सूचना प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी पत्रकाद्वारे दिल्या आहेत. मात्र या सुचनांकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दुर्लक्ष करत परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा 2017च्या शारीरिक चाचणीस उमेदवारांना हजर राहण्याची आजच घोषणा करण्यात आली आहे. 22 मार्चला अमरावतीत होणाऱ्या या चाचणीची घोषणा करणारे एक पत्र एबीपी माझाच्या हाती लागले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपसचिवांनी हे आजच्या तारखेचे घोषणा पत्र वेबसाईटवर टाकले आहे. काही उमेदवारानी ही बाब समोर आणली आहे.
शारीरिक चाचणीस उपस्थित न राहिल्यास अपात्र ठरवण्यात येईल असं ही या पत्रात नमूद केलेले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा आदेश पाळायचा की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अशा द्विधा मनस्थितीत उमेदवार आहेत. म्हणूनच ही चाचणी रद्द करावी अशी मागणी उमेदवार सरकारकडे करत आहेत. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग कारवाई करेल या भीतीने उमेदवार कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही आहेत.
यावरुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावाचे काहीच घेणं देणं नसल्याचं स्पष्ट होत आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करू असं म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर कारवाई करणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यांन राज्यात कोरोना विषाणू (COVID-19 ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व महाविद्यालय, विद्यापीठे दिनांक 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 31 मार्चच्या अगोदर नियोजित असलेल्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली ग्रामीणआणि शहरी भागातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठे तसेच परवानगी असेलेले खाजगी क्लासेस बंद असणार आहेत. दिनांक 26-27 दरम्यान राज्यातील कोरोना बद्दलची परिस्थिती पाहण्यासाठी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. या नियमांचे सर्व महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे.
Mumbai Local Running | मुंबईची लोकल आणि बस बंद करणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement