Milk Price Protest LIVE | दूध दराबाबत दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्त्वात बैठकीला सुरुवात

Maharashtra Protest for Milk Prices | स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी टँकरची फोडाफोडी करण्यात आली तर काही ठिकाणी देवाला अभिषेक घालून तर कुठे बैलांना दुधाची आंघोळ घालून आंदोलन सुरु झालं.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Jul 2020 02:38 PM
दूध दराबाबत दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्त्वात बैठकीला सुरुवात
नांदेड: दूध दरवाढीचे आंदोलन नांदेडमध्ये पोहोचले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बैलांना घातली दुधाने आंघोळ, बैलाला दुग्धाभिषेक करत केला सरकारचा निषेध, स्वाभिमानीचे नेते प्रकाश पोपळे यांच्या नेतृत्वात आंदोलन, धानोरा गावात हनुमानाला केला दुग्धाभिषेक, सरकारला सद्बुद्धी द्यावी असे देवाकडे घातले साकडे.
सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला अनुदान द्यावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर रस्त्यावर उतरलीय याच धर्तीवर बुलडाण्यात स्वाभिमानीचे रविकांत तुपकर व स्वाभिमानाचे कार्यकर्त्यांनी दुधाने अंघोळ करून हे आंदोलन केलं आहे. सोबतच घरोघरी जाऊन अनेकांना दूध वाटप करण्यात आलं आहे. सरकारने दुधाला भाव वाढून द्यावा दुध पावडरला प्रति किलोला 50 रुपये अनुदान द्यावे आणि तुप, दुध पावडर, व बटर यावरील जी एस टी कमी करावा अशी मागणी या आंदोलनातुन करण्यात आली आहेये सरकारने राजु शेट्टी यांच्या दुध बंद आंदोलन करत निषेध व्यक्त करून या आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुद्दत दूध बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद वाडी या गावात मुख्यमंत्री साहेबांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन केले. यावेळी दुधाला 5 रुपये प्रति लिटर अनुदान मिळाले पाहिजे. Gst रद्द झाला पाहिजे अशी मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांना अभिषेक घातल्या शिवाय राहणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
सोलापुरात जिल्ह्यातही स्वाभिमानीतर्फे वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून सरकारला गायीच्या दुधाला प्रतिलिटर 25 दर आणि प्रतिलिटर 5 अनुदान देण्याची सद्बुद्धी देण्याची प्रार्थना कार्यकर्त्यांनी केली. तुंगत गावांसह परिसरातील दूध बंद ठेवून उत्पादकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. यावेळी ग्रामदैवत श्री तुंगेश्वरालाही ही अभिषेक घालून साकडे घातले.
दुधाला मिळणाऱ्या कमी दरात करून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक होत असतानाच आता स्वाभिमानी संघटनेने यात उडी घेतली आहे. आज स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर दूध घेऊन जाणाऱ्या दोन टॅंकरच्या टायरमधील हवा सोडून दिली. 25 हजार लिटर क्षमता असलेले दुधाचे दोन टँकर गुजरात हुन हैदराबादकडे निघाले होते. बीड बायपासला या दोन टँकरला थांबून स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टँकरमधली हवा सोडून देऊन सरकार विरोधी घोषणा दिल्या.

मनमाडच्या येवल्यातील न्याहारखेडे गावात दूध दरवाढसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे अनोखे आंदोलन केलं असून दूध रस्त्यावर न फेकता ते गावातील गोरगरिबांना वाटलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तात्काळ दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारल्याने येवल्यातील न्याहारखेडे गावात दूध दरवाढ संदर्भात तालुकाध्यक्ष श्रावण देवरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी दूध रस्त्यावर न फेकता गावातील गोरगरीबांना ते वाटलं. तसंच दूध दरवाढ त्वरित करावी अशी मागणी यावेळी दूध उत्पादकांनी केली.
दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत आंदोलन, सरकार रुपी दगडाला घातला दुधाने प्रतिकात्मक अभिषेक, तर दूध फेकून देण्याऐवजी गोरगरिबांना वाटलं, सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा
येवला : न्याहारखेडे गावात दूध दरवाढसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे अनोखे आंदोलन केले असून दूध रस्त्यावर न फेकता ते गावातील गोरगरिबांना वाटले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तत्काळ दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारले असल्याने येवल्यातील न्याहारखेडे गावात दूध दरवाढ संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रावण देवरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी दूध रस्त्यावर न फेकता गावातील गोर-गरिब गरजूना ते वाटप करण्यात येऊन दूध दरवाढ त्वरित करावी अशी मागणी यावेळी दूध उत्पादकानी केली आहे.

दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. कुठे रस्त्यावर दूध ओतलं जात आहे तर कुठे देवाला किंवा दगडाला अभिषेक घातला जात आहे. त्यातच छावा संघटनेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच दुधात ठेवलं आहे. संकट जावे म्हणून पूर्वी देव पाण्यात ठेवले जायचे आता शेतकऱ्यांचे संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुधात ठेवलं आहे, असं छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबत व्हिडीओ देखील ट्विटरवर पोस्ट केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आज नागरिकांना संकलन केलेल्या दुधाचे वाटप करण्यात आलं. कौलव गावातील हे चित्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आज नागरिकांना संकलन केलेल्या दुधाचे वाटप करण्यात आलं. कौलव गावातील हे चित्र आहे.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला नाशिकमध्ये सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली दूध बंद आंदोलन सुरु झालं. चिंचखेड गावातील शिवमंदिरात दुग्धभिषेक घालत आंदोलन करण्यात आलं. दुधाला पाच रुपये अनुदान मिळावं, दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करावा तसंच तूप, बटर आणि इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी रद्द करावा, या प्रमुख मागण्या आंदोलकांच्या आहेत.

नगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दूध आंदोलन सुरुच आहे. अकोले तालुक्यातील अनेक गावात आजही आंदोलन केलं जात आहे. दगडाला दुग्धाभिषेक घालत हमीभाव मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. दूध दराबाबत किसान सभा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. डॉ. अजित नवले यांनी कालपासूनच आंदोलन पुकारलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या महामार्गावरुन गोकुळ संघाचे दूध पुणे-मुंबईकडे रवाना होतं त्या पुणे-बंगळुरु महामार्गावर पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

दूध दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी टँकरची फोडाफोडी करण्यात आली तर काही ठिकाणी देवाला अभिषेक घालून तर कुठे बैलांना दुधाची आंघोळ घालून आंदोलन सुरु झालं. सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जिल्ह्यात दोन ठिकाणी टँकर फोडून दूध रस्त्यावर सोडण्यात आलं. तर कोल्हापूरमध्येही आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळाले. इथे भैरवनाथाला अभिषेक घालून आंदोलन सुरु झालं खरं, मात्र त्यानंतर कार्यकर्त्यांनी इथेही दूध घेऊन जाणाऱ्या टेम्पोमधील दुधाचे कंटेनर रस्त्यावर रिकामी केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

कुठे कुठे आंदोलनाला सुरुवात?

सांगलीत गोकुळचा टँकर फोडला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सकाळपासून दोन ठिकाणी दुधाचा टँकर फोडण्यात आला. सुरुवातीला पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला. गोकुळ दूध संघाचा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता. याशिवाय कसबे डिग्रजहून मुंबईकडे निघालेला राजारामबापू दूध संघाचा एक टँकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडला.

कोल्हापुरात आधी अभिषेक मग फोडाफोडी
कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नांदनी या ठिकाणी भैरवनाथला दुधाचा अभिषेक घालून दूध दर आंदोलनाला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी गावागावात अभिषेक घातला. त्यानंतर बिद्री या ठिकाणी गोकुळचा टँकर फोडला.

बुलढाण्यात बैलांना दुधाची आंघोळ
बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील निरोड इथे स्वाभिमानीच्या वतीने प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात बैलांना दुधाची आंघोळ घालून आंदोलन केले आहे. सरकारने दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे, दूध पावडरला प्रति किलोला 50 रुपये अनुदान द्यावे आणि तूप, दूध पावडर तसंच बटरयावरील जीएसटी कमी करावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे. सरकारने राजु शेट्टी यांच्या दूध बंद आंदोलनाची दखल न घेतल्यास देशाला लागणारे अन्न धान्य बंद करावे लागेल, असा इशारा या आंदोलनातून सरकारला देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

सांगलीत दूध दर आंदोलनाचा भडका, स्वाभिमानीने टँकर फोडून हजारो लीटर दूध रस्त्यावर सोडलं

दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेसह विरोधी पक्ष रस्त्यावर, उद्या मंत्रालयात बैठक

VIDEO | स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ दुधाचा टँकर फोडला 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.