मुंबई : निवडणूक आयोगाचा (Election Commission) निकाल एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बाजूने लागला आणि सर्वच राजकीय गणित बदलून गेली. एकनाथ शिंदेना धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यावर पहिलं विधीमंडळातलं पक्ष कार्यालय ताब्यात घेतलं त्याचप्रमाणे विधानपरिषेदतही आपला प्रतोद दिला.  आता या एकनाथ शिंदेंच्या प्रतोदचं उद्धव ठाकरेंनाही ऐकायला लागेल का? याचीच चर्चा जास्त आहे.  


विप्लव बजोरिया विधानपरिषदेतले शिवसेनेचे आमदार 


निवडणूक आयोगाचा निकाल आपल्या बाजूने आल्यानंतर उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेनं परिषदेत विप्लव बजोरिया यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आणि राजकीय घमासान सुरु झालं.  विधानपरिषदेत उद्धव ठाकरे आमदार आहे आणि सभागृहात प्रतोदचा व्हिप हा महत्वाचा असतो.  त्यामुळे आता विप्लव बजोरियांचा व्हिप हा उद्धव ठाकरेंना लागू होणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.   


विधानपरिषदेत दोघांचेही 12 आमदार आहेत त्यापैकी एकमेव आमदार विप्लव बजोरिया शिंदेसोबत आहेत.  हीच संधी साधत शिंदेंनी बजोरियांची प्रतोद म्हणून निवड करत ठाकरेंची अडचण केली. 


प्रतोदचं महत्व काय असतं? 



  • प्रत्येक राजकीय पक्षाचा एक प्रतोद असतो 

  • सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या व्हीपनं चालत असते 

  • सभागृहात मतदान करायचं असेल तर व्हिपला मोठं महत्व असतं 

  • व्हीप हा पक्षाच्या सर्व आमदारांना तो बंधनकारक असतो. 

  • आमदारांनी या व्हिपचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते 


विधान परिषेदेत एकूण 78 आमदार आहेत 


भाजप - 22
शिवसेना - 01
ठाकरे गट - 10 
राष्ट्रवादी - 09 
कॅाग्रेस - 08
जनता दल - 01
राष्ट्रीय समाज पक्ष - 01
पीझंट्स ॲण्ड वर्कर्स पार्टी ॲाफ इंडिया - 01
अपक्ष - 04
रिक्त पद 21  आहेत 


राज्यात ठिकठिकाणी शिवसेना आणि ठाकरे वाद पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगानं निकाल दिल्यानंतर शिंदेनी विधीमंडळातलं कार्यालयही ताब्यात घेतलं . विधानसभेतले 40 आमदार शिवसेनेसोबत आहेत तर विधानपरिषदेतले एक आमदार शिवसेनेत आहेत. त्यामुळे विधानसभेनंतर शिवसेनेनं बजोरियांना प्रतोद म्हणून नेमले आणि ठाकरेंची अडचण करून ठेवली आहे.


कोर्टातल्या युक्तीवादानंतर दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांवर व्हिपमुळे कारवाई होणार नाही पण दोन आठवड्यानंतर शिवसेनेचे  प्रतोद भरत गोगावले आणि विप्लव बजोरिया हे ठाकरे गटाच्या आमदारांना कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Maharashtra Assembly Session Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खेळला मोठा डाव; उद्धव ठाकरेंनाही मानावा लागणार आदेश!