Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhajinagar District) धक्कादायक घटना समोर आली असून, दहावीत (SSC) शिकणाऱ्या एका तरुणाचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वैजापूर तालुक्यातील (Vaijapur Taluka) बोरसर गावात हा प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी पोलीस (Police) दाखल झाले असून, पंचनामा करण्यात येत आहे. तर प्रेमप्रकरणातून हत्या (Murder) झाल्याचा संशय मुलाच्या नातेवाईकांना व्यक्त केला आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. सचिन प्रभाकर काळे असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत मृत मुलाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन काळे हा विनायक नगर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. दरम्यान शुक्रवारी (24 फेब्रुवारी) रोजी सकाळी घरात कुणालाही काहीही न सांगता तो घरातून निघून गेला होता. मात्र बराच वेळ झाल्याने तो दिसून येत नसल्याने नातेवाईकांसह गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. दरम्यान आज त्याचा मृतदेह गावातील एका शेतात आढळून आला. त्यामुळे तात्काळ याची माहिती वैजापूर पोलिसांना देण्यात आली. तर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पाहणी करुन पंचनामा करत आहेत.
दोन्ही हात तोडलेले!
दरम्यान सचिन काळेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सचिनचे दोन्ही हात तोडण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हा सर्व प्रकार खुनाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत आहे. तर शवविच्छेदनानंतरच सर्व गोष्टी समोर येतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर घटनास्थळी गावकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय
सचिन काळे हा दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. दरम्यान त्याचा एका मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरु होते. तर ज्या मुलीसोबत हे प्रेमप्रकरण सुरु होते, त्याच मुलीच्या शेतात सचिन काळेचा मृतदेह आढळून आल्याचा दावा सचिनच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे याच प्रेमप्रकरणातून त्याची हत्या झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या सर्व प्रकरणी वैजापूर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचं देखील कळत आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून अजून कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
Cotton News: घरात साठवलेला कापूस ठरतोय डोकेदुखी; कापसात पिसवा, त्वचाविकारा वाढले