Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे म्हणाले संदेश नाही, थेट बातमी देणार; आता राज ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही थेट बातमी देणार, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: मनसेशी युती करणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काल मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही थेट बातमी देणार, असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान आज मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील शिवतीर्थ येथे ही बैठक पार पडले. त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशी चर्चा रंगलीय. अनेक नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया, सूचक वक्तव्यही येतायत. पण या सर्व चर्चांवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंनी, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावं असं म्हंटलं आणि त्यानंतर अवघ्या तासाभरात उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंसोबत युतीवर मोठं वक्तव्य केलंय. जे जनतेच्या मनात ते होईल असं म्हणत, आता थेट बातमीच देऊ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
उद्धव ठाकरेंनी एक कॉल करावा-
युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना एक कॉल करावा, उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे यावं. राज ठाकरे हे 100 पावले पुढे येतील असा विश्वास मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला. क्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. युती ही काही एक दिवसात होत नाही. त्यासाठी एक प्रक्रिया असते. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच राज ठाकरे करतील हे नक्की. जे सर्व नेते कॅमेरासमोर युतीसंदर्भात कॅमेरासमोर बोलतात त्यांनी एकदा उद्धव ठाकरेंना सांगावं. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना एक कॉल करावा. आम्ही खात्रीशीर सांगतो, तुम्ही एक पाऊल पुढे आला तर राज ठाकरे 100 पावले पुढे येतील हे नक्की, असं अविनाश जाधव म्हणाले. अमित ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आता उद्धव ठाकरे यांच्याकडून एक कॉल येणे ही अपेक्षा आहे असंही अविनाश जाधव यांनी सांगितले.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरु असताना मनसेचं बैठकीचं सत्र सुरु, VIDEO:
संबंधित बातमी:























