Nashik Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीत (Maharashtra NCP) फूट पडल्यानंतर, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ प्रथमच नाशिक (Nashik) शहरात दाखल होणार आहेत. दुसरीकडे उद्याच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची छगन भुजबळांच्या मतदारसंघात जाहीर सभा आहे. त्यातच ते भुजबळ देखील नाशिकला येऊन भव्य शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे समजते. त्यामुळे उद्या नाशिक शहरात चांगलेच राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेना (Shivsena) फुटून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याच घटनेची अजित पवारांनी घडवून आणली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत छगन भुजबळ यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेटपदी निवड झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे प्रथमच नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहे. शनिवार 8 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांचे पाथर्डी फाटा, नाशिक येथे आगमन होणार आहे. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी (Maharashtra NCP) पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत पार पडलेल्या बैठकीतून अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार टीकाही केली. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे जाहीर करत सुरवात नाशिक जिल्ह्यापासूनच करणार असल्याचे देखील जाहीर केले. त्यानुसार शरद पवार उद्या 8 जुलै रोजी येवला (Yeola) येथील बाजार समिती आवारात जनेतला संबोधित करणार असून येवला म्हणजे भुजबळांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्याच येवल्यात उद्या शरद पवार भुजबळांचा समाचार घेणार आहेत. तर दुसरीकडे या सभेच्या पूर्वी छगन भुजबळ यांचे नाशिक शहरात जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
शरद पवार, भुजबळ उद्या नाशकात
मंत्रिपदाची शपथ घेतलेले छगन भुजबळ उद्या नाशिकमधे येणार असून शरद पवार भुजबळ यांच्या बालेकिल्लात सभा घेत असतानाच छगन भुजबळ शक्ती प्रदर्शन करणार आहेत. दुपारी दोन वाजता नाशिकमधे भव्य स्वागत होणार असून पवारांच्या सभेला शह देण्याचा छगन भुजबळ यांच्याकडून शह देण्याचा प्रयत्न असणार आहे. तर शरद पवार दुपारी एक वाजता नाशिकमधे पोहचणार असल्याचे समजते आहे. दरम्यान सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पवार समर्थकांनी जोरदार तयारी करण्यावर भर दिला आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ नेते माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांनी सभास्थळाची पाहणी करत आढावा घेत आहेत. ईडीच्या धाकाने भुजबळांनी शरद पवारांना सोडल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. उद्याच्या सभेतून खा.पवार यांच्यासह इतर नेते भुजबळांना उत्तर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.