एक्स्प्लोर

'गृहमंत्र्यांना 100 कोटी कोण देतं? मीही गृहमंत्री होतो', छगन भुजबळांकडून अनिल देशमुखांची पाठराखण 

Chhagan Bhujbal on Anil Deshmukh Case : 100 कोटींच्या वसूली प्रकरणात जेलमध्ये असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या समर्थनार्थ आता राज्याचे छगन भुजबळ उतरलेत.

Pandhapur News : 100 कोटींच्या वसूली प्रकरणात जेलमध्ये असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या समर्थनार्थ आता राज्याचे मंत्री छगन भुजबळ उतरले आहेत. पंढरपुरात बोलताना त्यांनी गृहमंत्र्यांना कोण देतंय 100 कोटी? मीही गृहमंत्री होतो अशा शब्दात अनिल देशमुख यांची पाठराखण केली. भुजबळ म्हणाले की, अनिल देशमुख आणि दुसरी व्यक्ती म्हणे असे बोलले हे तिसरा चौथ्याला सांगतोय. अनिल देशमुख कोणाला बोलले. आपण लांबून ऐकले पण आपणास बोलले नसल्याचे सचिन वाझे याने चांदीवाल कमिशनला सांगितले होते.पण काही करून त्यांच्यावर मोठ्या रकमांचे आरोप ठेवायचे मग ईडीची केस करायची आणि जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये ठेवायचा हा सर्व ईडीचा प्रकार असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली.

यामुळे न्यायालयाचाही नाईलाज होतो असे सांगताना कुठे गेले पैसे? कोणी वसूल केले? काही सापडले का तुम्हाला? असा सवालही भुजबळ यांनी केला. असे सांगोपांगीवर केस उभी राहते आणि त्यानंतर अटक होते. हे आपण यापूर्वी 50 वर्षात कधी पहिले नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीची साथ सोडल्याच्या संदर्भात विचारलं असता भुजबळ म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना जरी आघाडीमधून बाहेर पडली असली तरी याचा कोणताही परिणाम कोल्हापूर निवडणुकीवर होणार नाही.  कोल्हापुरात तीनही पक्ष मजबुतीने काम करीत असून शिवसेनेतील मतभेद देखील दूर झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

अनिल देशमुख हेच या कटामागेच 'मास्टर माईंड'- ED

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच या कटामागेच 'मास्टर माईंड' आहेत,असं ईडीनं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. देशमुखांच्या जामीन अर्जाला विरोध करत हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे देशमुखांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. देशमुखांची सुटका झाल्यास साक्षीपुराव्यांशी छेडछाड करु शकतात, असं ईडीनं म्हटलं आहे. भ्रष्टाचाराच्या पैशातून देशमुखांनी कुटुंबियांच्या नावे संपत्ती खरेदी केली, असा आरोपही ईडीनं केला आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget