Sanjay Raut On CM Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज नागपुरातील (Nagpur) रेशीमबाग इथल्या डॉ. हेडगेवार स्मृतीभवन इथे आदरांजली वाहिली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Dr K B Hedgewar) यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं. यावर संजय राऊत यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावरून आता राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटत आहेत.


 


काही दिवसांनी काळी टोपी, खाकी पॅन्ट घालून मुख्यमंत्री येतील - संजय राऊत


मुख्यमंत्री शिंदेंच्या रेशीमबाग भेटीवरून संजय राऊत म्हणाले, संघ विचारांचा रेशमी कीडा हा त्यांच्या कानात वळवळत आहे. काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी आणि हाफ पॅंट घालून येतील एवढ्या लवकर बदल होईल असं वाटलं नव्हतं. असं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे.



एकदा मुख्यमंत्री कार्यालयात भाजपवाले कसे घुसतील, हे शिंदे गटाला कळणारही नाही - संजय राऊत


मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यालयावर शिंदे गटाने दावा केला. मात्र हा दावा करताना पालिकेच्या कार्यालयात घुसून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ताबा घेतला. या राड्यानंतर महापालिका आयुक्तांनी शिवसेनेच्या कार्यालयाला टाळं ठोकले आहे. यावर संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे गटाला धारेवर धरलं आहे. 


 


पालिका कार्यालयं सील करणं ही हुकूमशाही - संजय राऊत -
काल पालिकेत सगळे नाही, काही मोजकेच गेले होते,  मात्र जे गेले ते घुसखोरच आहेत. ते सगळीकडे घुसघोरी करत असतात पालिका कार्यालयं सील केली आहेत कशी केली गेली ही हुकूमशाही आहे. एकदा तुमच्या मुख्यमंत्री कार्यालयात भाजपवाले कसे घुसतील हे लवकरच कळेल असं संजय राऊत म्हणाले. 



एका बापाचे असतील तर येतील, राऊतांची संतप्त प्रतिक्रिया 
शिवसेना भवन हे बाळासाहेबांचं आहे, इथे कोणाचा बाप येऊ शकत नाही. शिवसेना भवन सर्वाचं आहे. नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदे यांच्या तक्रारी घेऊन यायचे आता त्यांनी काही बोलायचा अधिकार नाही असं सांगत संजय राऊतांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 


ठाकरे गटाचे नगरसेवक पालिका मुख्यालयात जमणार 


 


मुख्यमंत्री बनल्यानंतर नवा अनुभव मिळाला - एकनाथ शिंदे


नागपुरात रेशीमबागेत भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिवसेना-भाजप सोबत आहोत. हे एक प्रेरणास्थान आहे, स्फूर्तीस्थान आहे. इथे नतमस्तक व्हायला आलोय. बालपणी संघाच्या शाखेत गेलो होतो. इथे आल्यावर समाधान आहे. यात कोणताही राजकीय हेतू नाही. मुख्यमंत्री बनल्यानंतर मला इथे आल्यानंतर नवा अनुभव मिळाला आहे."


इतर बातम्या


Nagpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे RSS च्या रेशीमबाग कार्यालयात, डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन