Weather Update News : देशात वातावरणात सातत्यानं बदल (Climate change)  होत आहे. कुठे थंडीचा (Cold Weather)  कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं चित्र दिसत आहे. तर काही भागात पावसानं देखील हजेरी लावली आहे. दरम्यान, सध्या उत्तर भारतात (North India) कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. तसेच महाराष्ट्रात देखील गारठा चांगला वाढला आहे. तापमानाचा  (Temperature)पारा 15 ते 20 अंशाच्य आसपास असल्यानं शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, पुढच्या 24 तासात उत्तर भारतात दाट धुके पडण्याचा अंदाज स्कायमेटने (Skymet) वर्तवला आहे. 

Continues below advertisement

'या' भागात पावसाची हजेरी

सध्या उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला असला तरी काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. देशातील तामिळनाडू राज्यातील काही भागासह  दक्षिण किनारपट्टी, आंध्र प्रदेश, पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. तर कर्नाटक, केरळ आणि नागालँडमध्ये हलका पाऊस झाला आहे. ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. त्यामुळं तिथेही पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

पुढच्या 24 तासात या भागात दाट धुके पडण्याचा अंदाज

स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासात पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं आणखी हुडहुडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट वाढत असताना काश्मीरमधील श्रीनगरमध्ये किमान तापमान -4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. दरम्यान, खोऱ्यातील इतर भागात तापमान -8 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. काश्मीरमधील अनेक भागात पाण्याचे स्रोत गोठले असून, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

Continues below advertisement

महाराष्ट्रातही पारा घसरला 

राज्यातील वातावरणात देखील सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. सध्या राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यात तापमानाचा पारा हा 15 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरला आहे. सर्वात कमी तापमान हे उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) जाणवत आहे. मराठवाडा आणि विदर्भातही थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईतही (Mumbai) हुडहुडी वाढली आहे. नाशिक, पुणे, औरंगाबादमध्ये तापमानात वेगानं घट होत आहे. राज्यातील ग्रामीण भागांमध्येही थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान, ही वाढती थंडी रब्बी पिकांसाठी फायदेशीर आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Weather : पारा घसरला, महाराष्ट्र गारठला; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?