एक्स्प्लोर

Maharashtra Politics : घटनात्मक कोंडीच्या प्रसंगी सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निर्णय देईल, नीलम गोऱ्हेंचा विश्वास 

Maharashtra Political Crisis : शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य या निर्णयावर अवलंबून असताना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी एक चांगला ऐतिहासिक निर्णय येईल असे भाकीत व्यक्त केले.

Neelam Gorhe : सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) सुरु असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य या निर्णयावर अवलंबून असताना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी एक चांगला ऐतिहासिक निर्णय लवकरात लवकर येईल असे भाकीत व्यक्त केले आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी ती ऐकत असते, समजून घेत असते आणि मग निर्णय देत असते. ज्यावेळी अनेक राजकीय अथवा सामाजिक विषयांवर मोठी कोंडी होते आणि न्यायालयाच्या निर्णयाकडे जनता अपेक्षेने पाहत असते, अशा वेळी न्यायालयाकडून अतिशय चांगले आणि दिशादर्शक निर्णय मिळालेले आहेत. विशेषतः घटनात्मकरित्या ज्या तरतुदी आहेत, अशावेळी न्यायालये अंमलबजावणी करून अत्यंत काटेकोरपणे आणि चांगल्या रीतीने निर्णय देते असा देशाचा अनुभव आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील या राजकीय कोंडीबाबत देखील न्यायालयाकडून चांगला ऐतिहासिक निर्णय येईल असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले . 

जनताच यांना उत्तर देईल
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे अधिकार सर्वतोपरी सरकारचे असले तरी सध्या  राज्यात ज्या पद्धतीने पूरस्थिती आहे, रोगराई पसरू लागलीय, अशावेळी प्रशासनाला आदेश देऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम मंत्र्यांचे असते. पण अजूनही विस्तार होत नसला तरी विरोधी पक्षनेते अजित पवार, आणि आदित्य ठाकरे हे सध्या राज्यभर दौरे करीत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. हा सर्व प्रकार जनता उघड्या डोळ्याने पाहत असून जनताच याना उत्तर देईल असे सांगितले.
 
यामागे फार मोठी राजकीय शक्ती
शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर ज्या पद्धतीने केंद्रीय तपस यंत्रणेच्या त्रासाने शिंदे गटात गेले ते पाहता एक दिवस या दडपशाही विरोधात भारतीय जनता उभा राहील असे भाकीत नीलम गोऱ्हे यांनी केले. सध्या देश वेगळ्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीतून जात असताना वेगवेगळ्या पद्धतीने कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. हे फक्त राजकीय नेत्यांच्याच बाबतीत होत नसून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे.  ही घुसमट सामाजिक माध्यमावर बघायला मिळत असून गौरी लंकेश, गोविद पानसरे, नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यू नंतरही त्यांना ट्रॉल करायचे काम सुरु आहे. हे सर्व कोणाच्या पाठिंब्यावर सुरु आहे? असा सवाल करून यामागे फार मोठी राजकीय शक्ती असल्याचे सांगत गोऱ्हे यांनी भाजपाला लक्ष केले . सध्या समाजाच्या विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर शिवसेनेसोबत जोडली जाऊ लागली आहेत. समाजामध्ये जेवढी जागृती झपाट्याने होईल तसा  सर्व समाज या दडपशाही विरोधात उभा राहील असा विश्वास नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला . 

 

 

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget