Ajit Pawar : काही नेत्यांकडून आधी सुतोवाच, मग त्यानुसार होते केंद्रीय यंत्रणाची कारवाई, अजित पवारांचा निशाणा कोणावर?
Ajit Pawar : काहीजण आधीच टीम कुठे जाणार हे सांगतात. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ नये हीच माफक अपेक्षा आहे, असा आरोप अजित पवारांनी केला आहे.
Ajit Pawar : केंद्राच्या यंत्रणांना आणि राज्यांच्या यंत्रणांना चौकशी करायचा अधिकार आहे. मात्र काही नेते जे बोलतात तेच घडतंय, त्यानुसार संबंधित नेत्यावर कारवाई होते, असा खळबळजनक आरोप भाजप व केंद्रीय तपास यंत्रणांवर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता भाजप नेते किरीट सोमय्या, केंद्रीय यंत्रणा तसेच भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काय म्हणाले अजित पवार?
काहीजण आधीच टीम कुठे जाणार हे सांगतात - अजित पवार
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्य सरकार विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा हा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून राज्य सरकारमधील आणि प्रामुख्यानं शिवसेनेमधील अनेकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून लक्ष्य केलं जात आहे. अशातच आज शिवसेना (Shiv Sena) नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर ईडीकडून (ED) कारवाई करण्यात आली. यानरर अजित पवारांनी आरोप केलेत की, केंद्राच्या यंत्रणांना छापेमारी करण्याचा अधिकार आहे, मागे काहींनी कोणावर कारवाई होणार यावर सुतोवाच केला होता. आणि त्याप्रकारे कारवाई होते, अशाप्रकारे कोणाचा हस्तक्षेप नसावा. मात्र काहीजण आधीच टीम कुठे जाणार हे सांगतात. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ नये हीच माफक अपेक्षा आहे. असं वक्तव्य अजित पवारांनी केला आहे.
अनिल परबांवर कोणत्या प्रकरणी कारवाई? - अजित पवार
अजित पवार पुढे म्हणाले, अनिल परबांवर कोणत्या प्रकरणी कारवाई सुरू आहे, माहित नाही. राजकीय सुडपोटी कारवाई नको. यंत्रणांच्या कामात पारदर्शीपणा पाहिजे. माझ्याही नातेवाईकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीची कारवाई केली होती. तपास पारदर्शी होत असेल, तर कुणाची ना नाही. असं अजित पवार यावेळी म्हणाले. यापूर्वी ईडी, सीबीआयकडून कारवाई झाली, कोणाचाही हस्तक्षेप न होता चौकशी व्हायला हवी. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर देखील कारवाई होते, मात्र ही कारवाई पारदर्शक पद्धतीने कारवाई व्हायला हवी
...तरीदेखील भाजप नेते अजून दर कपात केली पाहिजे असं म्हणतात
अजित पवार यांनी इंधन दरकपातीवरून टीका करणाऱ्या भाजपला उत्तर दिलंय, ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने कुठल्याही प्रकारचा नवीन टॅक्स न लावता राज्याने इंधन दरवाढ केली नाही. केंद्राकडून वेगवेगळे टॅक्स लावले जातात, त्यामध्ये केवळ एकाच टॅक्स मधील रक्कम आपल्याला मिळतं आहे. व्हॅट कपातमुळे राज्याच्या तिजोरीवर 2400 कोटी रुपयांचा परिणाम झाला आहे. तरीदेखील भाजप नेते अजून कपात केली पाहिजे असं म्हणत आहेत. अलिकडे गॅसच्या किमती भयंकर वाढवतात आणि मग थोडया कमी करतात
ही निवडणूक बिनविरोध होणार नाही
राज्यसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. भाजपची तिसरी जगा निवडून येण्यासाठी काही मते आहेत. शिवसेनेकडे देखील काही मते शिल्लक आहेत. लवकरच प्रत्येकाचे उमेदवार जाहीर होतील. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असं अजित पवार म्हणाले.