Eknath Shinde :  शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी, 30 जून रोजी परतल्यावर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. बंडखोर आमदार उद्या सकाळी मुंबईत दाखल होणार असून त्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार असल्याचे म्हटले. त्यामुळे शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांचे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. 


शिवसेना बंडखोर आमदारांनी आज कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार असून कोणावरही बळजबरी केली नसल्याचे म्हटले आहे. इथे असलेले आमदार मोकळ्यापणाने वावरत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सगळे शिवसेनेमध्ये असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. बहुमताचा आकडा आमच्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी केला. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार आहेत. कोणत्याही आमदारावर जबरदस्ती केली नाही असे शिंदे यांनी म्हटले. आपल्या देशात बहुमताला महत्त्व आहे. ते बहुमत आमच्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व जोपासण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 


बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन


शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असून त्यांना मानवंदना देणार आहोत. त्याशिवाय, धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळीदेखील आम्ही आमदार जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनादेखील वंदन करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 


सुरतमार्गे गुवाहाटीमध्ये दाखल झालेले शिंदे गटाचे आमदार आज पहिल्यांदाच हॉटेल रॅडिसन बाहेर पडले. आज शिंदे गटाच्या आमदारांनी कडेकोट बंदोबस्तात कामाख्या देवीचे दर्शन घेतले. हे बंडखोर आमदार बुधवारी गोव्यात दाखल होणार आहेत. बहुमत चाचणीसाठी गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: