Bhandara News : वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी मोबाईलवर पैशाची मागणी केल्याप्रकरणी मोबाईलवरील संभाषणावरून भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंडळ अधिकारी आणि भंडाऱ्याचे तहसीलदार यांच्या वाहनचालकाला अटक केली आहे. अविनाश राठोड (वय 44) आणि रामू नेवारे (वय 56) असे लाच मागणाऱ्या अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. मोबाइल वरील संभाषणाच्या आधारे लाचेच्या मागणी प्रकरणी भंडारा लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.


लाचलुचपत विभागाकडून अटक


तक्रारदार हे मोहाडी तालुक्यातील रोहा येथील असून त्यांचे हार्डवेअरचे दुकान असल्याने रेती पुरवठा करण्याचे काम करतात. 7 जूनला भंडारा तहसीलदार आणि महसूल कर्मचारी यांनी बिना रॉयल्टी रेतीची वाहतूक करताना एक ट्रक पकडून त्याला पोलीस स्टेशन वरठी येथे आणले. यात कारवाई न करण्यासाठी मोबदला म्हणून चालक राठोड यांनी 5 हजार तर, मंडळ अधिकारी नेवारे यांनी 15 हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार यास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत कार्यालय गाठत तक्रार नोंदविली. मोबाइल वरील संभाषणाच्या आधारे लाचेच्या मागणी प्रकरणी भंडारा लाचलुचपत विभागाने अटक केली आहे


इतर महत्वाच्या बातम्या


Jalgaon : जळगावात दुर्देवी घटना; ट्रक-बोलेरोच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू, सहा जखमी


Maharashtra Political Crisis : उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना आदेश; विशेष अधिवेशन बोलावले


Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत, बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंची माहिती


भाजप सत्तापिपासू, त्यांनी शिवसेना फोडली याचा काळा इतिहास लिहिला जाईल, फडणवीसांची कृती त्यांच्यावरच उलटेल : सामना


ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्याच अध्यक्षतेखाली, हंगामी अध्यक्ष नाही, सूत्रांची माहिती