दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु, महाविकास आघाडीनं बहुमत सिद्ध करावं, भाजपची पत्राद्वारे राज्यपालांकडे मागणी, राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष


राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चालला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार आसाममधील गुवाहाटी येथे वास्तव्याला आहेत. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडून बंडखोर आमदारांना वारंवार परत येण्याचं आवाहन केलं जात आहे. 


महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी समर्थक आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींन सांगण्यात आलं. यासर्व प्रकारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदेंसोबतच्या काही आमदारांनी आपल्याला दमदाटी करुन, धमक्या देऊन सूरतमध्ये नेल्याचं सांगितलं. काहींनी मातोश्रीवर निरोप धाडले तर काहींनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत चक्क मुंबई गाठली. यासर्व घडामोडींमध्ये तो दिवस मावळला. पण घडामोडी काही थांबल्या नाहीत.  


2. एकनाथ शिंदे गटाकडून सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र आज राज्यपालांना पाठवलं जाण्याची शक्यता. पत्राच्या मसुद्यावर काल रात्री उशीरापर्यंत खलबतं झाल्याची सूत्रांची माहिती


3. भाजपकडून बहुमत सिद्ध करण्याची मागणी झाल्यानंतर आज महाविकास आघाडी न्यायालयाची दारं ठोठावण्याची शक्यता, सरकार वाचवण्यासाठी महाविकास आघाडीची धडपड


4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बंडखोरांना भावनिक साद, समोर येऊन बोला मार्ग काढू, तर आधी पुत्र आणि प्रवक्त्यांना आवरा, शिंदेंचं प्रत्युत्तर, आज दुपारी शिवसेना आमदारांसोबत उद्धव ठाकरेंची खलबतं


5. गुवाहाटीतल्या हॉटेलमधील कोणते आमदार संपर्कात आहेत त्यांची नावं शिवसेनेनं जाहीर करावी, एकनाथ शिंदेंचं ओपन चॅलेंज, गुवाहाटीतल्या मुक्कामानंतर पहिल्यांदाच दर्शन


6. औरंगाबादच्या नामांतराच्या प्रस्तावावर आज मंत्रिमंडळाकडून निर्णयाची शक्यता, कालच्या बैठकीत अनिल परब यांच्याकडून प्रस्ताव


7. उदयपूरमध्ये नुपूर शर्मांचं समर्थन करणाऱ्याची हत्या, आरोपींनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत हत्येची जबाबदारी स्वीकारली, एनआयएकडून घटनेचा तपास होण्याची शक्यता


8. महाराष्ट्रात जूनमध्ये अपेक्षित पाऊस नाहीच, विदर्भात कमी पावसाची नोंद, शेतकऱ्यांसाठी चिंतेचं वातावरण,  मराठवाड्यात सरासरी 32 टक्के अधिक पाऊस


9. कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू, मदत कार्य सुरु, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत


10. पालघरच्या तारापूर MIDC प्लांटला भीषण आग, सलग आठ मोठे स्फोट, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी