एक्स्प्लोर

Maharashtra Politics: ठाकरे गटाला पुन्हा धक्का? विधानपरिषदेतील आमदार शिवसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Politics: ठाकरेंना पुन्हा एक मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटातील विधान परिषद आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे, असा अंदाज सध्या व्यक्त होत आहे. ठाकरे गटातील एक मोठा नेता शिवसेनेत (Shiv Sena) (शिंदे गट) प्रवेश करणार आहे. ठाकरे गटातील विधान परिषदेचा एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची माहिती मिळत आहे. तसेच, आजच या आमदारासह काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आज शिंगे गटात प्रवेश करणार आहेत. 

ठाकरेंच्या विश्वासू नेता आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हा नेता विधान परिषदेचा आमदारही आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज दुपारीच हा प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एबीपी माझानं ही बातमी सर्वात आधी दिली. या आमदारासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत. 

बंडाच्या एक वर्षानंतरही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ काही कमी होण्याचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केला. मनीश कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर विश्वास दाखवत एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारीही सोपवली. एकनाथ शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी केली नियुक्ती केली आहे.

त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश करताच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचेच निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक अमेय घोले यांनीही नाराजी व्यक्त करत शिंदे गटाची वाट धरली होती. 

पाहा व्हिडीओ : Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार : ABP Majha

ठाकरे गटातून अजून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. अशातच विधान परिषद आमदारासह इतरही महत्त्वाचे पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी विधान परिषदेतील शिवसेनेचे आमदार विप्लव बजोरिया आणि आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता ठाकरेंकडून कोण शिंदेंकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे राज्यात राजकीय भूकंप सुरू झाला आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील समीकरणं बदलली आहेत. अशातच ठाकरेंकडून शिंदे गटाकडे जाणाऱ्यांचा ओघ अजून सुरूच आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra NCP Crisis: "मी 82 वर्षांचा असो, वा 92 वर्षांचा..."; अजित दादांच्या प्रश्नाला थोरल्या पवारांचं प्रत्युत्तर

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
Embed widget