Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : आपापल्या मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्याचे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना आदेश

Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE :सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठका झाल्या.पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jun 2022 11:13 PM
आपापल्या मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्याचे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना आदेश

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाची गुवाहाटीतील  बैठक संपली  असून या बैठकीत आमदारांना आपापल्या मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. "बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार मेळाव्यातून पुढे न्या, आपण शिवसेनेतच आहोत, आपल्याबद्दलचे गैरसमज दूर करा, सगळ्या कार्यकर्त्यांना एकसंध ठेवा, आपली जी सुरवातीपासूनची हिंदूत्व ही भूमिका आहे आणि मराठी या भूमिकेवर आपण कायम आहोत हे लोकांना सांगा,  अशा सूचना आमदारांना दिल्या आहेत.  


 


 

शिवसेना 16 बंडखोरांना अपात्रतेबाबत नोटीस पाठवणार, आमदारांना 48 तासात आपलं म्हणणं मांडावं लागणार

शिवसेना 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेबाबत नोटीस पाठवणार आहे. यानंतर बंडखोर आमदारांना 24 तासात आपली बाजू मांडावी लागणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष आणि सेना नेत्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रभर सभा घेणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

शिवसेना ही मर्दांची सेना आहे. शिवसेनेत गद्दार नको आहेत असे म्हणत येत्या काळात महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

मविआ सरकार पडणार नाही : आदित्य ठाकरे

नगरसेवकांना संबोधित करण्यासाठी ऑनलाईन आलेल्या आदित्य ठाकरे यांनी मविआ सरकार पडणार नाही अशी खात्री देत उद्धव ठाकरे हे जनतेचे आवडते मुख्यमंत्री असंही म्हटलं आहे.

Shivsena : शिवसैनिकांचा उद्रेक, मंगेळ कुडाळकरांच्या कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक

मंगेश कुडाळकर गुरुवारी शिंदे गटामध्ये सामिल झाल्यानंतर आज मुंबईमध्ये शिवसैनिकांचा उद्रेक झाल्याचं पहायला मिळतंय. आज शिवसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. 

Maharashtra Political Crisis : नरहरी झिरवाळ विधानसभेत पोहोचले, शिवसेनेची बाजू ऐकून घेणार

नरहरी झिरवळ विधानभवनात पोहचले असल्याची माहिती आहे. यावेळी सेना आमदाराना अपात्र करण्याबाबत शिवसेनेच म्हणणं काय आहे हे उपाध्यक्ष जाणून घेणार आहेत. यासाठी शिवसेनेची लीगल टीम, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, मंत्री सुभाष देसाई, विधिमंडळ सचिव देखील उपस्थित आहे. यामधे शिवसेना आपली बाजू कशी बरोबर आहे हे सांगणार असल्याची माहिती आहे. 

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांना आता शिवसेनेचे नाव वापरता येणार नाही, भाजप किंवा प्रहार पक्षात विलिन व्हावं- निलम गोऱ्हे

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात पेचप्रसंग उद्भवला असून त्यावर आता विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बंडखोरांची आमदारकी रद्द व्हायची नसेल तर त्यांनी कोणत्या तरी पक्षामध्ये विलिन व्हावं लागेल, त्यांना एकतीरल भारतीय जनता पक्षामध्ये किंवा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षामध्ये विलिन व्हावं लागेल असं विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या. एकनाथ शिंदे यांच्या गटाला आता शिवसेना हे नाव वापरता येणार नाही असंही त्या म्हणाल्या. 

Maharashtra Political Crisis : अविश्वास प्रस्तावामुळे विधानसभा उपाध्यक्षांना अपात्रतेचे अधिकारच नाहीत, दोन अपक्ष आमदारांचे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

Maharashtra Political Crisis : अविश्वास प्रस्तावामुळे विधानसभा उपाध्यक्षांना अपात्रतेचे अधिकारच नाहीत, दोन अपक्ष आमदारांचे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र. महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांचे उपाध्यक्षांना पत्र. विधानसभा नियम 179 अन्वये नरहरी झिरवळ यांना हटविण्यासंदर्भात यापूर्वीच पत्र दिले असल्याने आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार नाहीत. 2016च्या सर्वोच्च न्यायालयाचा दिला पत्रात दाखला घटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल असेल तर त्यावर निर्णय होईस्तोवर त्यांना आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार राहत नाहीत.


नरहरी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव भाजपने दोन दिवांपूर्वीच दाखल केला आहे. त्यामुळे कोणत्याही आमदारांचे निलंबन ते करू शकत नाही. या तारखेनंतर कितीही प्रस्ताव दाखल झाले तरी आधी अविश्वास प्रस्ताव वर निर्णय घ्यावा लागेल. मग आमदारांचे निलंबन, ही एक मोठी राजकीय खेळी आहे जी भाजपने खेळली आहे. 

नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक, शिंदे समर्थकांच्या बॅनरला फासले काळे



नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरला शिवसैनिकांनी काळे फासले आहे. त्यामुळे शहरात उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक अशा दोन गटात चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे. एकीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्य राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यात प्रामुख्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि बंड खोर एकनाथ शिंदे गट यांच्यात दोन दिवसापासून रणकंदन माजले आहे. अशातच राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये देखील याचे पडसाद उमटत असून शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे समर्थक यांच्यात जोरदार बॅनर वॉर पाहायला मिळत आहे. 

 

याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे समर्थक असलेल्या गटाने काल शहरात महत्वाच्या ठिकाणी बॅनरबाजी केली आहे. मात्र  शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरला शिवसैनिकांनी काळे फासले आहे. नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये एकनाथ शिंदे समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र आता कट्टर शिवसैनिकांकडून याला विरोध दर्शवत शहरात शिंदे समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरबाजीला कट्टर शिवसैनिकांनी काळे फासले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचे नाशिकमध्ये देखील आशा पद्धतीने पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे.


 

 



 
Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे गुवाहाटीतील हॉटेलमधून रवाना

Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे गुवाहाटीतील हॉटेलमधून रवाना, रेडिसन हॉटेलमधील आमदारांची बैठक संपली, शिंदे कुठे जाणार याबाबत स्पष्टता नाही

Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे गुवाहाटीतील हॉटेलमधून रवाना, रेडिसन हॉटेलमधील आमदारांची बैठक संपली, शिंदे कुठे जाणार याबाबत स्पष्टता नाही

शिवसेनेकडून आणखी चार जणांविरोधात अपात्रतेसाठी नावे दिली 

शिवसेनेकडून आणखी चार जणांविरोधात अपात्रतेसाठी नावे दिली 


1) सदा सरवणकर


2) प्रकाश आबिटकर


3) संजय रायमुळकर


4) रमेश बोरनारे

विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे राज्यपालांना पत्र, गेल्या दोन दिवसात घेतलेले निर्णय रद्द करण्याची मागणी

विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे राज्यपालांना पत्र, गेल्या दोन दिवसात घेतलेले निर्णय रद्द करण्याची मागणी, गेल्या 48 तासात 160 च्यावर आदेश काढल्याचा दावा

Maharashtra Political Crisis : संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना चॅलेंज


Sanjay Raut LIVE : महाविकास आघाडी मजबूत आहे, शिंदे गटाची वेळ निघून गेलीय, आता आमची वेळ- संजय राऊत

Sanjay Raut LIVE : महाविकास आघाडी मजबूत आहे, शिंदे गटाची वेळ निघून गेलीय, आता आमची वेळ- संजय राऊत

Maharashtra Political Crisis : राजकीय घडामोडींना वेग, बैठकांचा सिलसिला सुरु

Eknath Shinde : पाकिस्तान, सौदी, थायलंडमध्येही एकनाथ शिंदेंच्या चर्चा!

Eknath Shinde LIVE : Eknath Shinde Top Search : एकनाथ शिंदेच्या बंडामुळे देशातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली असतानाच आता पाकिस्तानमध्येही शिंदेच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकाराणाला हदरवून सोडणारे एकनाथ शिंदे नेमके कोण आहेत याची उत्सुकता पाकच्या नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानी नागरिक एकनाथ शिंदेंबाबत गुगलवरुन माहिती शोधण्याचा प्रयत्न करातायेत. पाकिस्तानातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी एकनाथ शिंदेंविषयी माहिती सर्च केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांना मागे टाकत एकनाथ शिंदे गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर आले आहेत. पाकिस्तानसोबतच सौदी अरेबिया, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, जपान आणि कॅनडातही एकनाथ शिंदेंच्या नावाने गुगल सर्च केलं जात असल्याचं कळत आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Chandrakant Patil : एकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव नाही : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : भाजपकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. आमची 13 जणांचा कमिटी आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही चर्चा करुन सांगतो असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. शरद पवार आणि संजय राऊत यांना जरा जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मोहित कंबोज भाजप्रमाणेच एकनाथ शिंदे यांचा देखील चांगला मित्र आहे. त्याचे सगळ्याच पक्षात चांगले मित्र असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Rajesh Kshirsagar Update: राजेश क्षीरसागर अखेर गुवाहाटीमध्ये पोहोचले, क्षीरसागर यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

Rajesh Kshirsagar Update: राजेश क्षीरसागर अखेर गुवाहाटीमध्ये पोहोचले, क्षीरसागर यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पुढच्या राजकारणाची दशा आणि दिशा ठरवणाऱ्या दोन महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पुढच्या राजकारणाची दशा आणि दिशा ठरवणाऱ्या दोन महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात. बहुमतासाठी गरजेपेक्षा आवश्यक आकडा हाती असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे गटाची गुवाहाटातील रॅडिसन हॉटेलमध्ये बैठक सुरु आहे. तर काल दिल्लीत गेलेले फडणवीस मुंबईत परतले आहेत. त्यांनी अमित शाह आणि नड्डांशी चर्चा केल्याचं कळतंय. 

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंनीच शिंदे गटाकडे आमदारांना पाठवलंय? एकनाथ शिंदे काय म्हणाले...

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्ता संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. तसेच त्यांना शिवसेनेतील आमदारांच्या मोठ्या गटानं पाठिंबा दिला आहे. सध्या शिंदे गट आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहे. शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आहेत. त्यातील एक म्हणजे, हा उद्धव ठाकरेंचाच प्लान असून त्यांनीच आमदारांना बंड करण्यास सांगितलं आहे. तसेच, शिंदे गटाकडे एकापाठोपाठ एक आमदारांचं जाणं हाही त्याचाच भाग आहे. एबीपी माझाशी एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन बातचित केली असता, त्यांना यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंसोबतच्या 40 आमदारांच्या पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कॉन्स्टेबल, कमांडोंवर कारवाई!

Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आमदारांसह आधी सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठलं. मात्र याबाबत प्रशासनाला माहिती मिळू शकली नव्हती. त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या जवळपास 40 आमदारांच्या PSO अर्थात पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आहे.  पोलिसांना याबाबत कुणकुणही लागली नाही, याबाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ नॉट रीचेबल

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ नॉट रीचेबल


राज्यात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी संदर्भात उपाध्यक्ष यांची सावध भूमिका?


नरहरी झिरवाळ यांच्या शासकीय निवासस्थान बंद तर विधानभवनात ही उपस्थित नाहीत


नरहरी झिरवाळ कुठे आहेत याची त्यांच्या कर्मचारी यांना ही कल्पना नाही


त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आहेत तरी कुठे?


सत्ता स्थापनेत विधानसभा उपाध्यक्ष यांची असणार महत्त्वाची भूमिका

शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या जवळपास 40 आमदारांच्या PSO अर्थात पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या जवळपास 40 आमदारांच्या PSO अर्थात पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होणार,  राज्य सरकार या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, या सर्व आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राची हद्द सोडत असताना या सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनाला आणि गुप्तचर विभागाला माहिती न दिल्याने या सर्वांवर कारवाईचे आदेश, राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना त्या त्या जिल्ह्यातील आमदारांच्या या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश

एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील  दरे गावातील बंगल्याला मोठा पोलिस बंदोबस्त

राज्यातील राजकारणात मोठा भूकंप घडवणारे एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या शिवसैनिक नाराज असल्याचं आणि महाराष्ट्रातून त्यांच्याविरोधात उग्र भूमिका असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील  दरे गावातील त्यांच्या बंगल्याला मोठा पोलिस बंदोबस्त लावला आहे. 

शिवसेनेनं बोलावली मुंबई महापालिका नगरसेवकांची बैठक,  सायंकाळी सात वाजता शिवसेना भवनात शिवसेना नगरसेवकांची बैठक

शिवसेनेनं बोलावली मुंबई महापालिका नगरसेवकांची बैठक,  सायंकाळी सात वाजता शिवसेना भवनात शिवसेना नगरसेवकांची बैठक, मनपा नगरसेवकही एकनाथ शिंदेंसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सतर्क 

'शरद पवार यांच्याबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही'; संजय राऊत यांचं ट्वीट

'कायद्याप्रमाणे आमची बाजू भक्कम',एकनाथ शिंदे एबीपी माझावर लाईव्ह

कायद्याप्रमाणे आमची बाजू भक्कम... कारवाईच्या धमकीनंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया...


 


Maharashtra Political Crisis : शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी आव्हान; संघटना वाचवण्याचं आणि कायदेशीर लढाईचं आव्हान

Maharashtra Political Crisis : आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं हादरलेल्या शिवसेनेसमोर आता दोन आव्हानं उभी ठाकलीत. एकनाथ शिंदेंना बहुतांशी आमदारांनी पाठिंबा दिल्यानं आता विधिमंडळ पक्ष वाचवण्यासाठी कायदेशीर लढा द्यावा लागणार आहे. तर दुसरीकडे या फुटीनं संघटनाही दुभंगली असल्यानं संघटन टिकवण्याचंही आव्हान आहे. याआधीही शिवसेनेला खिंडार पडलं तेव्हा बंडखोर आमदारांची संख्या तुलनेनं कमी असल्यानं विधिमंडळात पक्ष वाचवण्यासाठी फारसं लढावं लागलं नव्हतं. पण यावेळी दोन तृतीयांश पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांनी आपलीच शिवसेना खरी असं आव्हान दिलंय. ते विधानसभा, राज्यपाल आणि कोर्टापर्यंत जाण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे विधिमंडळ पक्षावरील दाव्यापासून ते पक्षचिन्हं वाचवण्यापर्यंत कायदेशीर संघर्ष करावा लागेल अशी चिन्हं आहेत. तर पक्ष संघटन टिकवतानाही उद्धव ठाकरेंची कसोटी लागणार आहे.

Maharashtra Political Crisis : गुवाहाटीतील हॉटेलात सर्व बंडखोर आमदार बैठकीला हजर राहणार

Maharashtra Political Crisis : बारा बंडखोर आमदारांवर कारवाईच्या शिवसेनेच्या मागणीनंतर एकनाथ शिंदे गट आक्रमक झालाय. थोड्याच वेळात गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमध्ये शिंदे गटातील आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला 46 आमदार उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. ज्यात शिवसेनेचे 37 तर अपक्ष 9 आमदारांचा समावेश आहे. आज शिंदे गट मविआ सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासंदर्भात राज्यपालांना पत्र पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. या मोठ्या निर्णयासंदर्भात देखील या बैठकीच चर्चा होऊ शकते. 

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक आज दुपारी 12 वाजता

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात होणार आहे.

Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार गुवाहाटीत दाखल

Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE :  चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार गुवाहाटीत दाखल, राजकीय हवेचा कल कळताच आमदार गीता जैन यांच्यासोबत काल संध्याकाळी जोरगेवार गुवाहाटीकडे झाले रवाना, आ. जोरगेवार यांनी फुटीर गटात सामील होण्याबाबत विचार करण्याचे दिले होते संकेत, आमदार किशोर जोरगेवार महाविकास आघाडीचे समर्थक आमदार म्हणून होते सोबत पण राजकिय दिशा बदलताच किशोर जोरगेवार यांनी सोडली सरकारची साथ

उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 13 आमदारांनी हजेरी लावल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं

 


2.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 13 आमदारांनी हजेरी लावल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं. त्यापैकी काही आमदार हे वर्षा बंगल्यावर उपस्थित होते, तर आदित्य ठाकरे हे मातोश्रीवरून उपस्थित होते. तर संजय राऊतांनी शिंदेंच्या गटातील 21 आमदार संपर्कात असल्याची माहिती दिली


 

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील बंडखोर आमदारांसोबतचा एक व्हिडीओ काल सकाळी जारी केला

 1. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील बंडखोर आमदारांसोबतचा एक व्हिडीओ काल सकाळी जारी केला. या व्हिडीओमध्ये  गुवाहाटीत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या गटात 49 आमदार होते. त्यापैकी 42 आमदार शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदार उपस्थित होते.

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis :   शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठका झाल्या. काल दिवसभर राजकीय पटावर  भाजपची एन्ट्री झाली नाही. काल दिवसभरात अनेक गोष्टी घडल्या आहेत. दिवसभरात घडलेल्या दहा घडामोडी जाणून घेऊया


1.  हे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील बंडखोर आमदारांसोबतचा एक व्हिडीओ सकाळी जारी केला. या व्हिडीओमध्ये  गुवाहाटीत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या गटात 49 आमदार होते. त्यापैकी 42 आमदार शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदार उपस्थित होते.


2.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 13 आमदारांनी हजेरी लावल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं. त्यापैकी काही आमदार हे वर्षा बंगल्यावर उपस्थित होते, तर आदित्य ठाकरे हे मातोश्रीवरून उपस्थित होते. तर संजय राऊतांनी शिंदेंच्या गटातील 21 आमदार संपर्कात असल्याची माहिती दिली


3. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यांनी (बंडखोर आमदारांनी) शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेचे बहुमत आहे. ते फक्त रुसून तिथे गेले आहे. त्यांचा रुसवा फुगवा निघाला की, ते पुन्हा सोबत येतील'', असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.


4. मुख्यमंत्र्यांनी काल फेसबुक लाईव्हमधून आमदारांना आवाहन केल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिलंय. आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा आरोप आमदार शिरसाट यांनी केलाय.  या आहेत आमदारांच्या भावना असं सांगत एकनाथ शिंदे यांनी हे पत्र ट्विट केलंय. 


5. शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन राऊत यांनी दिले.


6.  संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राज्यात बैठकांचं सत्र सुरु झालं.  बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, नाना पटोले यांची एच.के. पाटील यांच्यासोबत  काँग्रेसनं तातडीनं वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली.  तर नाना पटोलेंनी आम्ही महाविकासआघाडी  सोबत आहे, असे म्हणत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.


7.  राष्ट्रवादी काँग्रेसची देखील बैठक झाली. या बैठकीत शरद पवार, अजित पवार उपस्थित होते. बैठकीत शरद पवारांनी आपण महाविकास आघाडी सोबत असून ही लढाई शेवटपर्यंत लढणार असल्याचे सांगितले. तर संजय राऊत म्हणाले, का उगाच वण वण भटकताय? घरचे दरवाजे उघडे आहेत.. अशी साद घालत संजय राऊत यांनी बंडखोरांना चर्चेचं आमंत्रण दिलेय. गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र


8. सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. संजय राऊत यांच्या ' ..तर महाविकास आघाडीतून बाहेर' पडण्याच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, कदाचित आमदारांना परत बोलावण्यासाठी सुद्धा तसं वक्तव्य केलेलं असावं.


9. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या सर्व बंडखोर आमदारांचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत शिंदेंनी भाजप पाठीशी असल्याचं स्पष्ट म्हंटलंय भाजप काहीही कमी पडू देणार नाही असं शिंदे आमदारांना सांगत आहेत.कुठेही कमी पडणार नाही,असे सांगितले.  
 
10. राज्य सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेला आहे. त्यामळं शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावंच लागेल. तसंच हे सरकार बहुमतात आहे की नाही  हे विधानसभेत स्पष्ट होईल, असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं. तर बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण  राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिली आहे.


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.